सिरमचे 14 हजार 220 कोविडशिल्ड लस जालन्यात दाखल
विजय साळी , लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना दि .१३ जानेवारी:- जिल्ह्यातील सहा सरकारी रुग्णालयात कोव्हीड जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना, अंबड येथील जिल्हा उप रूग्णालय,ग्रामीण रूग्णालय परतूर व भोकरदन, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव व खादगाव या सहा ठिकाणी कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यवस्था उभारण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अर्चना भोसले यांनी बुधवारी दिली.
येत्या 16 जानेवारी पासून लसीकरण सुरू होते आहे पुणे येथील सीरम इंन्टीट्युटच्या कोविशिल्ड या लशीचे 14 हजार दोनशे वीस डोसेस् जिल्हा परिषदेच्या लशीकरण केन्द्रात आलेली आहे असे भोसले यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ची कोविशिल्ड नावाची लस आली असून त्याचे जवळपास 14,200 डोस आले आहेत, आणि हे सर्व डोस आपल्याला प्राप्त झाले असून ही लस कोल्ड स्टोरेज मध्ये त्याचे तापमान 2 डिग्री ते 8 डिग्री सेंटिग्रेड मध्ये ठेवण्यात आली असून जालना जिल्ह्याचे जिल्हा वॅक्सिन स्टोर मध्ये याला ठेवण्यात आले आहे, याच्या वाटपाचे नियोजन असे की, जालना जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी 16 तारखेला लसीकरण होणार असून त्यामध्ये जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, ग्रामीण रुग्णालय परतूर आणि भोकरदन तसेच PHC सेलगाव आणि PHC खासगाव या 6 ठिकाणी हे लसीकरण होणार आहे,ही लस आधी औरंगाबाद येथील विभागीय उपसंचालक कार्यालयास प्राप्त झाली होती आणि आज आपल्याला जालन्यासाठी प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली.
Comments are closed.