Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दीड वर्षात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योध्याचा सत्कार

केंद्रातील मोदी सरकारच्या ७ वर्षपूर्ती निमित्त खा. अशोक नेते यांचा उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : केंद्रातील मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड च्या लॉकडाऊन काळात गेल्या दीड वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, नगर परिषदेचे शववाहिका व स्वर्गरथ चालक यांचा सत्कार काल दि. ३० मे रोजी खा. अशोक नेते, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, डॉ. मडावी, डॉ. परसवाणी, डॉ. जगदीश बोरकर, डॉ प्रीतम पेशेट्टीवार, तसेच धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, अहेरी, येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिपरिचारिका, नर्स, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रुग्णवाहिका/ शववाहिका चालक, नगर परिषदेतील स्वर्गरथ चालक व अन्य कर्मचारी यांना खा. अशोक नेते व अन्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,  न.पं. उपाध्यक्ष अनिलजी कुणघाडकर, भाजयुमो चे जिल्हा महामंत्री संजयजी बारापात्रे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, महिला आघाडीच्या अध्यक्ष दुर्गाताई काटवे, आदिवासी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई शेडमाके, शहर महिला आघाडीच्या निलिमा राऊत,  शहर महामंत्री कविताताई बारसागडे, रोशनीताई बानमारे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, झोपडपट्टी आघाडी चे श्यामजी वाढई, राकेश राचमलवार, राजुभाऊ शेरकी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर राहणार सुरु

धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!

 

Comments are closed.