तेनझींग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार-२०२२ साठी अर्ज आमंत्रित
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 10 जुलै – युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, केंद्र शासनाद्वारे दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी दि.१४ जुलै, २०२३ पर्यंत नामांकने मागविण्यात आलेली आहेत. सदर पुरस्काराची केंद्र शासनाद्वारा प्राप्त सर्वंकष माहिती सोबत जोडली आहे.
- या पुरस्कारासाठी नामांकन सादर करणा-या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षांमधील असणे आवश्यक आहे.
- पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी याठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे.
- पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम अत्युकृष्ट असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.