Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वान दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आल्लापल्ली, दि. ७ डिसेंबर : स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय, सांस्कृतिक विभागातर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बहुजनांचे उद्धारक, यांचा महापरिनिर्वाण दीन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले, प्रमुख वक्ते प्रा. दामाजी डोंगरे, प्रा. रामराव नन्नावरे, तसेच डॉ. रामदास कुबडे, डॉ. नीरज खोब्रागडे, डॉ. राजेश सुर, प्रा. प्रतिमा सूर्यवंशी, प्रा. राजूरकर, प्रा. ढवळे, प्रा. गंपावार प्रा. मद्दीवार, प्रा. घसगंटीवार उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येवून माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्ष महोदय तसेच प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या विचारानुसार कृती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रकाश सोनुले तर आभार प्रदर्शन प्रा. राणी कुमरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. सूर्यवंशी, प्रा.  गंपावार, होशान वासेकर, देविदास देवाडकर, प्रदीप तलांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

कैलासवासी राजे सत्यवाणराव महाराज यांची जयंती साजरी

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने उमेदवारांना बसला धक्का!

नक्षल सप्ताहाचा केला निषेध…

 

Comments are closed.