Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अचानक स्वच्छंद फिरतांंना आढळला वाघ… अन् जवळ असलेल्या लोकांना अचानक दीसल्याने उडाली तारांबळ.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरात जेसीबी चालकांनी घेतलेला व्हिडिओ झाला व्हायरल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ८ डिसेंबर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा वाघ वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरात स्वच्छंद फिरताना आढळला. या भागात काम करणाऱ्या मजुरांनी जेसीबी चालविताना हा व्हिडिओ घेतलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर वीज केंद्रातील विस्तीर्ण परिसरात सुमारे चार वाघांचे वास्तव्य आहे. याशिवाय बिबटे-अस्वली आणि अन्य वन्यजीव देखील परिसरात सातत्याने दर्शन देत असतात. वाघांच्या या वाढत्या वावराने परिसरातील नागरीक आणि कामगार मात्र दहशतीत आहेत.

नुकतेच वीज केंद्राच्या बाहेर कोळसा खाण विश्रामगृह परिसरात वन्यजीव हल्ल्यात कामगार जखमी झाला होता. वाघाच्या ताज्या व्हायरल व्हिडिओने चंद्रपूर वीज केंद्रातील वाघांच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

… या गावात वाघाची पहिली शिकार; वासराचा पाडला फडशा

वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद

नक्षल सप्ताहाचा केला निषेध…

 

Comments are closed.