Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर तालुक्यातील क्रिकेटचे भीष्माचार्य कल्लू भैय्या उर्फ महेंद्र शुक्ला यांचे निधन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 18 ऑगस्ट :-  पालघर तालुक्यातील क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे कल्लू भैय्या उर्फ महेंद्र शुक्ला यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची दिव्यानंद, ब्रम्हेंद्र आणि शिवम अशी तीन मुलं, तसेच तीन बहिणी आणि तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. महेंद्र शुक्ला हे रात्री झोपले ते सकाळी उठले नाहीत म्हणून नातेवाईक बघायला गेले तेव्हा ते मृतावस्थेत आढळले. त्यामुळे कदाचित त्यांना झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन असल्याचे सांगण्यात येत आहे.

कल्लू भैय्या उर्फ महेंद्र शुक्ला हे पालघर मधील आर्यन शाळा आणि आर्य क्रीडा मंडळामार्फत कबड्डी, खो-खो आदी खेळात खेळाडूंना नेहमी प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देत असत. पालघर मधील हजारो मुलांना त्यांनी क्रिकेट शिकवले आणि एखादं व्रत घेतल्याप्रमाणे आधी आर्यन शाळा आणि मग जीवन विकास शाळेच्या मैदानात सतत सीजन क्रिकेट टूर्नामेंट भरवत राहिले. पालघरमध्ये क्रिकेट रुजवण्यात त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“पालघरच्या क्रिकेटचे पितामह म्हणजेच कल्लू उर्फ महेंद्र शुक्ला,पालघर तालुक्यातील सीजन क्रिकेट व कल्लू यांचे नाते दृढ होते. ह्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही. आम्ही शाळेत असताना टेनिस बॉल ने क्रिकेट खेळत असु . आम्हाला खूप अभिमान होता की पालघरची टीम त्रिमूर्ती ही लेदर बॉल ने म्हणजेच सीजन क्रिकेट खेळत असतात .आम्ही त्यांची मॅच बघण्यासाठी आर्यन शाळेच्या मैदानावर जात असू . सहावी सातवीत असतानाच हळूहळू आम्हाला सीजन क्रिकेटची गोडी लावली. आम्ही नववी दहावीत असताना प्रत्यक्ष मॅच खेळण्यासाठी ही दिले. थोडक्यात आमचा क्रिकेटचा पहिला गुरु हा कल्लू उर्फ महेंद्र शुक्ला हेच होते. त्यांना क्रिकेट बद्दल तळमळ होती. तसंच गेली 30 वर्षापेक्षा जास्त पालघर मधील जुना पालघर चा सार्वजनिक गणपती हा खूप प्रसिद्ध आहे हे गणपती सुरू करण्यास कल्लू उर्फ महेंद्र शुक्ला यांचा सिंहाचा वाटा आहे. दरवर्षी न चुकता श्रावण महिना सुरू झाला की मंडप, मूर्ती आणणं हे सर्व एक खांबी तंबू प्रमाणे महेंद्र शुक्ला करत असत.” अशा शब्दात शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक आणि पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री केदार काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, यापुढेही पालघर तालुका खेळात विशेषता क्रिकेटमध्ये अग्रेसर राहील व त्यांनी स्थापन केलेला जुना पालघर चा सार्वजनिक गणपती उत्सव अविरतपणे थाटात साजरा होईल हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असेही श्री केदार काळे म्हणेल.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कसरत करून पायपीट करत प्रशासन पोहोचले मरकटवाडीत. 

 

वसईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्कूल बस ला अपघात ! 

Comments are closed.