Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्राणहिता येथील सीआरपीएफ ३७ बटालियन द्वारा ५३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी  : अहेरी स्थित प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात तैनात  सीआरपीएफ ३७ बटालियनचा ५३ वा स्थापना दिवस गुरुवारी मोठ्या हर्षोल्हासात हा कार्यक्रम ३७ बटालियन चे कमांडंट एम.एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी कमांडंट रामरस मीना यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी जवानांना संबोधित करतांना मीना यांनी जवानांना बटालियनच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. १ जुलै १९६८ ला केरळ राज्याच्या राखीव बटालियन ला ३७ व्या बटालियनच्या रुपात केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सामील करण्यात आले. तेव्हापासून ही बटालियन देशाची आंतरिक सुरक्षा, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात चोख कामगिरी बजावत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राणहिता कॅम्प मध्ये ३७ बटालियन द्वारा  स्थापना दिवसाच्या औचित्याने वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शहीद स्मारकावर शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर सीआरपीएफ जवानांच्या व कर्मचाऱ्यांमध्ये व्हाॅलीबॉल आणि रस्सीखेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेनंतर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या व्यतिरिक्त बटालियनच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भामरागड, धोडराज, लाहेरी, नारगुंडा व कोठी या गावातील लोकांना स्वावलंबन करण्यासाठी 37 बटालियन द्वारे भामरागड तालुक्यात सामाजिक कार्याची माहिती दिली.

नजीकच्या भविष्यात संगणक, टेलरिंग, ड्रायव्हर्स, गवंडी इत्यादींसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही घेतले जातील, या माध्यमातून अधिकाधिक गरजू ग्रामस्थांना या कार्यक्रमांचा लाभ घेता येईल जेणेकरून परिसरातील सर्व नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील.  या योजनेच्या माध्यमातून या भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाईल.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सीआरपीएफ-९ बटालियनचे अधिकारी आर. एस. बाळापूरकर,  द्वितीय कमांडिंग ऑफिसर रामरस मीणा आणि उप कमांडंट अमित सांगवान, राजेंद्र सिंह, बी.सी. राय आणि विजेंद्र सिंह, वैद्यकीय अधिकारी डॉ. संपत कुमार एम आणि अरविंद सहारा, सुबेदार मेजर भूपेश कुमार झाडे, अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांची उपस्थित होती.

हे देखील वाचा :

गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीची याचिका फेटाळली

आजपासून होणार हे नवे 9 महत्त्वाचे बदल; काही दिलासा तर काही बोजा वाढवणारे जाणून घ्या ……

कोविड प्रादुर्भावमूळे ज्यांचे पालक दगावले असतील त्यांचे पूर्ण शिक्षण हे मोफत करण्याचा निर्णय

 

Comments are closed.