Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चाकणमधील बाल गुन्हेगारी परत एकदा चव्हाट्यावर ! खुनातील 12 पैकी 6 आरोपी अल्पवयीन

अल्पवयीन मुलांमध्ये बाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक, बदला घेण्याची मनोविकृति वाढल्याने बालगुन्हेगारीत वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चाकण  17 ऑक्टोबर :- चाकणमधील बाल गुन्हेगारी परत एकदा चव्हाट्यावर आली आहे. मागील वर्षी झालेल्या एका खुनाचा बदला घेण्यासाठी मागील आठवड्यात आणखी एक खुन झाला आहे. या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असणार्या 12 जणांमध्ये 6 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. खुन का बदला खुन से लेंगे या मनोविकृतीमुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गुंड टोळया अशा मुलांचा उपयोग गुन्हेगारी करण्याकरीता करीत आहेत. हे अत्यंत चिंताजनक आहे. मागील काही काळात खुन, खुनाचा प्रयत्न, खुनाचा बदला, जबरी चोर्या, लुटमार आणि गंभीर मारामार्या अशा विविध गुन्ह्यांमध्ये अडकत असलेले अधिकांश आरोपी तरूण युवक आणि पंधरा से सतरा वयोगटातील अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे.

चाकण मार्केट यार्ड समोरील पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून मागच्या वर्षी 6 सप्टेंबर 2021 रोजी रोहित सहानी वय 17 रा. चाकण या तरूणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी युसूफ अर्षद काकर याच्या सहित 6 जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे वर्षभराने युसूफ अर्षद काकर वय 19 रा. खंडोबा माळ, चाकण्ण या तरूणाची हत्या मागील सोमवारी 10 आॅक्टोबर 2022 ला करण्यात आली. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात प्रणव संजय शिंदे या प्रमुख आरोपी सहित 12 जणांविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या हत्येत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या 12 पैकी 8 जण अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चाकण मध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात गुन्हा, अटक, सुटका आणि पुन्हा गुन्हा अशा दुष्टचक्रात अडकलेल्या बालगुन्हेगारांची संख्या धक्कादायकरित्या वाढली आहे. या अल्पवयीन गुन्हेगारांची सामान्य नागरिकांत मोठी दहशत असल्याचे समोर येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चार वर्षापूर्वी 2018 चाकण येथे शिवाजी विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणार्या सोळा वर्षीय अल्पवयीन विद्याथ्र्याची हत्या आणि त्याच्या सतरा वर्षीय मित्रावर प्राणघातल हल्ल्यानंतर पसरत गेलेल्या बालगुन्हेगारीचा विळखा रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. गुन्हेगारीच्या क्रौर्य इतिहासावर नजर टाकल्यास चाकणची बाल गुन्हेगारी मागील काळात वाढत गेल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षात प्रशांत बिरदवडे वय 19, त्यानंतर अनिकेत शिंदे वय 16 याची हत्या, त्या आधी मुटकेवाडीतील रोहन भुरूक हत्या, महाळुंगेतील संतोष वाळके, त्यानंतर हर्षल बोर्हाडे हत्या, त्याचप्रमाणे अन्यत्र युवकांकडून झालेल्या हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांच्या घटना, प्रचंड वाढलेले पिस्तुल कल्चर आणि यातील अल्पवयीन मुलांचा सहभाग हे सगळे प्रकार धक्कादायक मानले जात आहे.

अल्पवयीन गुन्हेगारीकडे आकृष्ट होण्यासाठी दबदबा, सुड घेणे, कुख्यात होणे, हलाखीची परिस्थिती आणि स्वतचे किंवा आपल्या युवकांच्या गटाचे वर्चस्व निर्माण करण्याच्या इर्षेतुन हत्या, हत्येचा प्रयत्न, दो गटांमधील संघर्ष असे प्रकार सातत्याने घडू लागले आहे. भाईगिरीचे आकर्षण, घरची परिस्थिती अशा कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असून यामुळे चाकण औद्योगिक भागातील कायदा व सुव्यवस्थेचा भंग होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धोक्याची घंटा

वाढती बालगुन्हेगारी आणि जुवेनाईल जस्टीस अॅक्ट च्या मर्यादा पोलीसांचे हात बांधून ठेवत आहेत.

हे पण वाचा :-

अंधेरीत भाजपची माघार ..पण अपक्ष उमेदवारांचे काय ?

गारखेडा गाव विकणे आहे ! ग्रामपंचायत बंद, शाळा बंद, मतदानावर बहिष्कार

Comments are closed.