Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गारखेडा गाव विकणे आहे ! ग्रामपंचायत बंद, शाळा बंद, मतदानावर बहिष्कार

सेनगाव तालुक्यातील गारखेडा गावाची व्यथा, भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या जन्मभूमीला न्याय द्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

हिंगोली, 17 ऑक्टोबर :- ज्या नानाजी देशमुखांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार अंगिकारत आपले सर्व आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले. समाजातल्या तळागळातील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले पूर्ण जीवन घालवले, त्याच नानाजी देशमुखांच्या जन्मगावातील जनतेला न्याय मागण्यांसाठी आपले गाव विकावे लागत आहे. यापेक्षा आणखी दुर्दशा काय असू शकते !

हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा या गावाची ही व्यथा आहे. गेल्या तीन वर्षापासून या गावातील शेतकरी अतिवृष्टी ने आर्थिक संकटात सापडला आहे. कोणतीही मदत शेतकर्यांना मिळत नाही. पीक विमा भरूनही विम्याचा परतावा मिळत नाही. यावर्षी सुध्दा मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तरी ही सरकार लक्ष्य देत नाही. म्हणून हिंगोली जिल्ह्यातील गारखेडा गाव विक्रीला काढले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावातील सर्व घरे, शेत जमीनी आणि सर्व गुरे शेतकर्यांनी विक्रीला काढले आहेत. आर्थिक परिस्थिति हलाखीची झाल्याने गावातील सर्व नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन ही गावकर्यांनी प्रशासनाला दिले आहे. गेल्या तीन वर्षापासून पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पीक विमा काढूनही नुकसानीचा विमा परतावा मिळत नाही आणि बिल न भरल्याने महावितरणच्या वतीने वीज कनेक्शन बंद केले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांची दिवाळी यावर्षी ही अंधारातच होणार आहे. परिणामी आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या गावकर्यांनी चक्क गावंच विक्रीला काढले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एसटी बसच्या धडकेत एक ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

Comments are closed.