Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटी बसच्या धडकेत एक ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बुलढाणा, 17 ऑक्टोबर :-  एसटी बसच्या धडकेत एकाची घटनास्थळी मृत्यू झाली असून एक व्यक्तीची उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या वेळेस घडली. एसटी महामंडळाच्या बस ने दुचाकी वाहनाला जबर धडक देल्याने एक व्यक्तीची घटनास्थळी मृत्यू झाला असून एक व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये गजानन शेळके वय 55 आणि प्रकाश जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

एसटी महामंडळाच्या नादूरूस्त बससे, वाहन चालकांचे गाडी चालवतांना नियंत्रण सूटणे, खड्डेमय रस्ते, विनाकारण ओव्हरटेक करने आदि कारणांमुळे रस्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ही यापेक्षा वेगळी स्थिति नाही. बुलढाणा जिल्ह्यात नादूरूस्त बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मोताळा तालुक्यात बस चालकाच्या निष्काळजी मुळे झालेल्या अपघातात एक व्यक्तीला आपले दो हात गमवावे लागले होते. या घटनेला काही कालावधी उलट नाही तोच बोधा घाटात काल रात्री झालेल्या अपघातात दो लोकांचा आपला जीव गमवावा लागला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघातातील मृतक गजानन शेळके हे जिल्हा सामान्य रूग्णालय बुलढाणा येथे कक्षसेवक म्हणून कार्यरत होते. ते आपल्या दुचाकी ने मित्र प्रकाश तोताराम जाधव राहणार कोलवड यांच्यासोबत शेगाव कडे निघाले असता मोर्शी से बुलढाणा या एसटी बस ने ज्ञानगंगा अभ्यारण्यातील देव्हारी फाट्याजवळ दुचाकी ला जोरदार धडक दिली. या धडकेत गजानन शेळके यांची घटनास्थळावरच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले प्रकाश जाधव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बसचालकांनी गाडी चालवतांना काळजी घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आकांक्षित जिल्हयात नाविण्यपूर्ण कामातून विकास होतोय – केंद्रीय राज्यमंत्री, रामदास आठवले

चाळ माफिया पती विरुद्ध पत्नीचा एल्गार

Comments are closed.