Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देसाईगंज पोलीसांनी 12 अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन केले जप्त

02 चारचाकी वाहन व 12 गोवंशीय जनावर जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

देसाईगंज:-  शहरात रोजी रात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरुन देसाईगंज ते जुनी वडसा रोडने जाणार आहेत. अशा गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने  जुनी वडसा रोड वरील पोपटी लॉनजवळ सापळा रचुन दोन्ही वाहनांना थांबवुन सदर वाहनांची तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले होते.

गाडी क्रमांक 1) एमएच 40 सी.डी. 8649 अशोक लेलँड टाटा कंपनीची प्रणय राजेंद्र बुल्ले, वय 21 वर्षे रा. देऊळगाव, ता. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांचे ताब्यातील वाहनात 05 बैल, दुसरी गाडी क्रमांक 2) एम एच 36 ए. ए. 0076 बोलेरो पिकअप राजेश सोमेश्वर बावनकर, वय 24 वर्षे, रा. वेळवा, ता. पवणी, जि. भंडारा याचे ताब्यातील वाहनात 07 बैल प्रति बैल एकुण दोन्ही चारचाकी वाहनात 12 गोवंशीय जनावरे जप्त आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

12 गोवंशीय जनावरे जप्त करुन आरोपी नामे 1) सचिन मधुकर बावनथळे, वय 25 वर्ष, रा. येंगलखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली (बैल मालक) 2) प्रणय राजेंद्र बुल्ले, वय 21 वर्षे रा. देऊळगाव, ता. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर 3) राजेश सोमेश्वर बावनकर, वय 24 वर्षे, रा. वेळवा, ता. पवणी, जि. भंडारा यांच्यावर पोलीस स्टेशन, देसाईगंज येथे अप. क्र. 033/2025 कलम 5 (अ),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1976, सहकलम 11 (ड) (ई) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा 1960, सहकलम 3 (5) भान्यासं, सहकलम 119 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.