Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या सोयीसाठी निःशुल्क ऑक्सिजन कान्सट्रेटरची सोय

  • केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सौजन्याने उपक्रम.
  • गरजू रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : कोरोना या महाभयंकर आजाराच्या दुसऱ्या लाटेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत होती अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी चंद्रपूर किंवा नागपूर येथे हलवावे लागत होते. यावेळी काही रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याची जाण ठेवून व सेवाभावी वृत्तीने या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून माणुसकीच्या दृष्टीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रुग्णांच्या सोयीसाठी 200 ऑक्सिजन कान्सट्रेटर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

या मागणीची दखल घेत ना. गडकरी यांनी लोकसभा क्षेत्रासाठी ऑक्सिजन कान्सट्रेटर उपलब्ध करून दिले. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सौजन्याने खा. अशोक नेते यांच्या पुढाकाराने प्राप्त झालेल्या ऑक्सिजन कान्सट्रेटर ची सेवा आजही अविरत सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोकसभा क्षेत्रातील आरमोरी, वडसा, कोरची, देवरी, आमगाव, सालेकसा, सावली, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, चिमूर, गडचिरोली व धानोरा इत्यादी तालुक्यामध्ये ऑक्सिजन कान्सट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याद्वारे कोरोना बाधीत मात्र गृह विलगिकरनात असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची सोय अविरत सुरू आहे. तसेच गडचिरोली येथे खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन उपलब्ध असून आजपर्यंत अनेक नागरिकांना निःशुल्क ऑक्सिजन सेवेचा लाभ देण्यात आला.

यात नवेगाव ( मुरखळा), रामनगर, आरमोरी विधानसभा, ठाकूरनगर ता. चामोर्शी, डोंगरगाव ता. सिंदेवाही, बसेरा कॉलनी, गडचिरोली, गांधी वॉर्ड, गडचिरोली, संताजीनगर, गडचिरोली इत्यादी वॉर्डातील रुग्णांना जनसंपर्क कार्यालयामार्फत निःशुल्क ऑक्सिजन सेवा पुरविण्यात आलेली आहे.

आजही ऑक्सिजन सेवा अविरत सुरू असून गरजू नागरिकांनी ऑक्सिजन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा  :

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास ठराव पारित!

दोन युवतींवर जडले प्रेम, एकाच मांडवात केले दोघींशी लगीन

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

 

Comments are closed.