Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या आदेशाला सरकारने दिली स्थगिती, टास्क फोर्सच्या बैठकीनंतरघेतला निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई १२ऑगस्ट: राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील  पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेत शाळा सुरु  करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. या संवादामध्ये त्यांनी शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या सूचनानंतर निर्णय घेण्यात येईल, असं म्हटलं होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

अन…’ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’, आ.प्रणिती शिंदें

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा-शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

 

“वंशाला दिवा पाहिजे” ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं.

Comments are closed.