Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राऊत यांना हायकोर्टाचा दिलासा… ईडीचा अर्ज फेटाळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 25 नोव्हेंबर :- शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणांत कोर्टाने दिलेला जामीन रद्द करावा म्हणून ईडीने मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या समोर सादर केलेल्या अर्जावर सुनावणीस नकार देऊन न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांनी हा अर्ज फेटाळला. हा ईडीला मोठा धक्का असून संजय राऊत यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी देखील ईडीने संजय राऊत यांना मिळालेला जामीन रद्द करावा म्हणून न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्याकडे अर्ज केला होता. परंतू ‘नॉट बीफोर मी’ म्हणत न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा अर्ज फेटाळला होता. आता पुन्हा न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांनी संजय राऊत यांच्या विरुद्धचा जामीन रद्द चा अर्ज फेटाळला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोरेगाव येथील पत्राचाळ येथील ६७२ रहिवाशाना फसविले असल्याचा राऊत यांचेवर आरोप आहे. सन २००५ मध्ये मे.गुरू आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीस पुनर्विकास करण्यासाठी पत्राचाळ रहिवाशांनी नियुक्ती केली होती. मात्र या जागेचा काही भाग हा प्रवीण राऊत यांनी बिल्डरांना विकला असा प्रवीण राऊत यांचेवर आरोप आहे. २०१० साली प्रवीण राऊत यांनी या कंपनीचे शेअर एचडीआयएल कंपनीला विकले,प्रवीण राऊत यांचे नावाने १०० कोटी वळवण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये हे माधुरी राऊत यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात वळवण्यात आले. असे हे एकंदरीत प्रकरण आहे. आता या प्रकरणी जामीन रद्द करण्याचा अर्ज निकाली निघाल्यामुळे संजय राऊत यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोवर रूबेला आजारासंबंधी सतर्क रहा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ

शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार ; बळीराजाच्या कष्टाचे चीज झाले

Comments are closed.