Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोवर रूबेला आजारासंबंधी सतर्क रहा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 25 नोव्हेंबर :-  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर रूबेला आजाराचे ४५५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १२१ रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करता हापकिन रिसर्च इन्स्टिट्यूट, परेल, मुंबई येथे पाठविण्यात आले. त्यापैकी ४५ रूग्ण हे गोवर रूबेला बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झालेला आहे. सदर अहवाल अंतर्गत १३ रुग्णांचे गोवर रूबेला लसीकरण झालेले आहे व इतर रुग्णांचे गोवर रूबेला लसीकरण झालेले नाही. सदर अहवाला अंतर्गत ०३ गोवर बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी पहिला मृत्यू न्यू आझाद नगर, कादरिया मज्जित, गायत्री नगर या क्षेत्रातील असून मृत्यू पावलेल्या बालकाचे वय ०६ महिने आहे. दुसरा मृत्यू सलामत पुरा, नदी नाका या क्षेत्रातील असून मृत्यू पावलेल्या बालकाचे वय १४ महिने आहे. तिसरा मृत्यू इस्लामपुरा, मिल्लत नगर या क्षेत्रातील असून मृत पावलेल्या बालकाचे वय ०८ महिने आहे.

सदर रुग्ण बाधित कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित रुग्णांना विटामिन ए चा पहिला डोस व २४ तासानंतर दुसरा डोस दिला जात आहे. तसेच ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर रूबेलाचा डोस घेतला नाही अशा लाभार्थ्यांना गोवर रूबेला दिला जात आहे. भिवंडी कार्यक्षेत्रात २४० टीम गोवर रूबेला सर्वेक्षणासाठी आयोजित करण्यात आलेले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच भिवंडी शहरात दिनांक २४/११/२०२२ रोजी रईस हायस्कूल मधील मुलांद्वारे जनजागृती करणे करिता रॅली काढण्यात आली आहे. तसेच दिनांक २५/११/२०२२ रोजी गोवर रूबेला आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता गोवर रूबेला आजार संबंधित मस्जितद्वारे धर्मगुरू (मौलाना) यांचे मार्फत गोवर आजार संदर्भात जनजागृती करणे करिता आवाहन करण्यात येणार असल्याबाबतची माहिती माननीय प्रशासक तथा आयुक्त यांनी दिली.

ताप आणि अंगावर पुरळ असलेला एखादा रुग्ण आढळल्यास त्वरीत जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी व आपल्या कार्यक्षेत्रातील ए.एन.एम. व अशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधावा तसेच आपल्या ५ वर्षाखालील बालकांचे एम. आर .चा पहिला व दुसरा लसीकरण डोस पूर्ण झालेला नसेल तर जवळच्या नागरिक आरोग्य केंद्र येथे जाऊन लसीकरण डोस पूर्ण करून घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नागरिकांना केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार ; बळीराजाच्या कष्टाचे चीज झाले

वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक चेंबूर पोलिसांची लक्षणीय कामगिरी

Comments are closed.