Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु – तीन मालमत्ता सील व एक ड्रेनेज खंडन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 25 नोव्हेंबर :-  नांदेड-वाघोळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सध्या होत असलेल्या वसुलीचे प्रमाण कमी असल्याने कर वसुली वाढविण्यासाठी व कर वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी मालमत्ता जप्ती नळ खंडन, ड्रेनेज खंडन करुन सक्तीने कर वसुली करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दि २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मा. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपायुक्त तथा मुल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी यांच्या नियत्रणाखाली क्षेत्रीय कार्यालय क्र. 1 अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी राजेश चौहाण, संतोष जिंतुरकर, विठ्ठल तिटके, साहेबराव ढगे व त्यांच्या पथकाने मालमत्ता क्र.4020122041 वर रु. 1लक्ष18हजार269/ कर थकीत असल्याने सदर मालमत्ता धारकाचे दुकान सिल करण्यात आले. तसेच मालमत्ता क्र.1- 22-1130/3व पीन क्र. 40101220391 या मालमत्तेवर रु 2लक्ष17 हजार665/ कर थकीत असल्याने सदर मालमत्ता सील करण्यात आली.
·
क्षेत्रीय कार्यालय क्र. 4 अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, किरणसिंघ, हरमिंदर सिंग गिरीश काठीकर व त्यांच्या पथकाने आर्य हिंदी विद्या मंदीर मालमत्ता क्र. 4-5-415 मालमत्तेवर रु3लक्ष48हजार 155/ कर थकीत असल्याने शाळेचे कार्यालय व दोन खोल्या सील करण्यात आल्या. नमुना आय ची नोटीस घेण्यास नकार दिल्याने सदर कार्यालयात नोटीस डकविण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

क्षेत्रीय कार्यालय क्र. 5 अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, जी. जी तोटावाड व पथकाने मालमत्ता क्र.9-3-99 या मालमत्तेवर रु. 45हजार 69 कर थकीत असल्याने सदर मालमत्तेचे ड्रेनेज खंडीत करण्यात आले. महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांनी आपला चालु व थकीत कर करुन शास्ती माफी व सुट योजनेचा लाभ घ्यावा मालमत्ता जप्ती सारख्या अप्रिय घटना टाळाव्यात असे आवाहन अति आयुक्त गिरीश कदम यांनी केले आहे. यापुढेही अशाच कारवाई सुरुच राहतील असे सांगितले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संजय राऊत यांना हायकोर्टाचा दिलासा… ईडीचा अर्ज फेटाळला

गोवर रूबेला आजारासंबंधी सतर्क रहा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ

 

Comments are closed.