Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आजपासूनच तयारीला सुरुवात केल्यास तीन ते चार वर्षात जिल्ह्यात खेळाडू तयार होतील – जिल्हाधिकारी, दीपक सिंगला

गडचिरोलीमध्ये सायकल रॅली मधून दिल्या ऑलम्पिक संघास शुभेच्छा.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनीही भारतीय ऑलिम्पिक संघास दिल्या शुभेच्छा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.23 जुलै : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गडचिरोली शहरांमध्ये सायकल रॅलीद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथे सांगता कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी उपस्थित खेळाडू व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय सर्व सहभागी खेळाडू तसेच महाराष्ट्रातील दहा खेळाडूंना ऑलिंपिक साठी शुभेच्छा दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, गडचिरोलीमधील युवकांनाही क्रीडा प्रकारात खूप मोठी संधी आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी आज आत्तापासूनच प्रत्येकासाठी वेळ महत्त्वाची असते. आज पासून जर तुम्ही युवकांनी कोणत्याही खेळांमध्ये नैपुण्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली तर येत्या तीन ते चार वर्षात चांगले खेळाडू गडचिरोली मधून बाहेर पडतील.

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सकाळी ७.३० वा. सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. सायकल रॅलीला हिरवी झेंडी कुमारी एंजल देवकुले आंतरराष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट खेळाडूने दाखविली. यावेळी इंदिरा गांधी चौकात खेळाडूंबाबत संदेश देणारा सेल्फी पॉइंट ठेवण्यात आला होता.

जिल्हा क्रीडा संकुल येथे मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व जीवनातील क्रीडाविषयक महत्त्व उपस्थितांना सांगितले.

या कार्यक्रमाला संजीव ओहळ मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली, राजकुमार निकम शिक्षणाधिकारी माध्यमिक, सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी, गजानन बादलमवार संशोधन सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय, जयालक्ष्मी सारीकोंडा तालुका क्रीडा अधिकारी अहेरी, घनश्याम वरारकर क्रीडा अधिकारी, संदीप खोब्रागडे क्रीडा अधिकारी, विजय खोकले राज्य क्रीडा मार्गदर्शक, नितेश झाडे जिल्हा संघटक, विशाल लोणारे, खुशाल मस्के, संदीप पेदापल्ली, महेंद्र रामटेके, प्रवीण बारसागडे, चंद्रगुप्त कुनघाडकर, कुणाल मानकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन नितेश झाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय खोकले यांनी मानले.

संबंधित बातमी : भारतीय ऑलिम्पिक संघास प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन 

 

हे देखील वाचा :

मोठी बातमी: रायगडमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा मृत्यू

जनविरोधी धोरणांच्या विरोधात लढा तीव्र करणार : तिसऱ्या आघाडीची गडचिरोली बैठक

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

 

Comments are closed.