Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा २५ जून ला सन्मान

भाजयुमो च्या जिल्हा बैठकीत विविध विषयांवर चर्चा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २३  जून : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली ची महत्वपूर्ण बैठक दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य साई मंदिर, चामोर्शी रोड गडचिरोली येथे पार पडली.

या बैठकीत आणीबाणी काळामध्ये तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ येत्या २५ तारखेला भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा आयोजित “संवाद” कार्यक्रमाची माहिती संदर्भात सदर बैठकित सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच १९७५ मध्ये आणीबाणी च्या काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान २५ जून रोजी करण्यात येणार आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. अशोक नेते उपस्थित होते तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे होते.

बैठकीला प्रामुख्याने आ. डॉ देवराव होळी, आ. कृष्णाजी गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुरके, प्रदेश सचिव राहुलजी खंगार, प्रदेश सचिव कल्याणजी देशपांडे, भाजपचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जीपच्या महिला व बालकल्याण सभापती रोशनीताई पारधी, युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

मोठी बातमी : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट

राज्यात आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

 मी राजकारणात आले म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय –  खा. नवनीत राणा

 

 

Comments are closed.