Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाविद्यालयीन युवकांना राजे धर्मराव महाविद्यालयाकडून रोजगाराची दूसरी संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २३ जून :  स्थानिक राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली ने चंद्रपूर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमीकल्स इंजिनिअरींग अँन्ड टेक्नॉलॉजी (CIPET) यांच्याशी संपर्क साधून नूकताच MoU करार मिलींदकूमार भरणे joind director &  Hod CIPET व डॉ. मारोती टिपले प्राचार्य राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली यांनी जागतिक योगदिनाचे औचित्य साधून केला आहे.

त्यावेळी नावेद, राहूल उके, पंकज वाघमारे आणि डॉ.एन.टि.खोब्रागडे, डॉ.आर.डब्लू. सूर प्रा.डी.टि.डोगंरे, प्रा.एच. के. राजूरकर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण CIPET या संस्थेकडून मिळणार आहे. या करारानुसार महाविद्यालयीन युवकांना स्वयंरोजगाराची व नौकरीची उत्कृष्ट संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.

ह्या अगोदर महाविद्यालयाने २०२०-२०२१ या सत्रात हैद्राबाद येथील SIS व सेक्यूरिटी स्किल कौन्सिल ऑफ इंडिया लि. यांना महाविद्यालयात भरती कॅम्पसाठी विनंती करून परिसरातील तरूण बेरोजगार युवकांना व माजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्या एकंदर ९३ तरूणांना स्थायी नौकरी ची संधी उपलब्ध करून दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे परिसरातील जनतेने व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव महाराज ह्यांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यू. टिपले यांना धन्यवाद दिले. पूनश्च अशा संधी महाविद्यालयाने द्याव्यात असा सूर ग्रामीण भागातील जनतेकडून येत आहे.

हे देखील वाचा :

मोठी बातमी : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट

राज्यात आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

पिक कर्ज द्या अन्यथा नक्षलवादी होण्याची परवानगी द्या! – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजबच मागणी

 

 

Comments are closed.