Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अधिकारी व कर्मचा-यांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्यास नोव्हेंबरचे वेतन मिळणार

वाशिम जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस. यांचे जिल्ह्यातील सर्व उपकोषागार अधिका-यांना निर्देश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिमदि. १० नोव्हेंबर : ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी औद्योगीक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोवि‍ड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पुर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी आस्थापनेतील कर्मचारी,व्यावसायीक,फेरीवाले,रिक्षा,टॅक्सी चालक व इतर कामगार कर्मचारी यांचे तात्काळ लसीकरण पुर्ण करुन घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे.

जिल्हयात कोविड- १९ या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी कोवि‍ड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक असल्याने, कमीत कमी एक मात्रा घेतली असल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच माहे नोव्हेंबर २०२१ या महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे. ज्या अधिकारी व कर्मचा-यांनी कोवि‍ड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा अद्याप घेतलेली नाही,अशा सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन अदा करण्यात येवु नये. असे निर्देश जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी जिल्ह्यातील सर्व उपकोषागार अधिका-यांना दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यात २०८८ प्राध्यापक भरतीला मंजुरी – मंत्री उदय सामंत

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध 

 

Comments are closed.