Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली वनक्षेत्रात ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 17 ऑगस्ट :-  महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वनविभागातील आलपल्ली, अहेरी, पिरमल्ली, पेड्डीगुडम, मार्कांडा, घोट, चार्मोशी या वनक्षेत्रात यावेळी मोटरसायकल रॅली, वृक्षारोपण, सहित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे आलापल्लीच्या प्रांगणात वनकर्मचारी यांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ.किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली यांचे हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती पियूशा जगताप, उपवनसंरक्षक वाहतूक विभाग बल्लारशाह या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आशिष पांडे, उपवनसंरक्षक भामरागड, राहुलसिंह टोलिया, उपवनसंरक्षक आलपल्ली, वरून आर.बी. भावीसे परिविक्षाधिंन उपस्थित होते.
याप्रसंगी परेड पथकांना, तसेच क्षेत्रीय कर्मचारी, वनमजुर, वनरक्षक, वनपाल, कार्यालयीन कर्मचारी, यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


डॉ. किशोर मानकर यांनी परेडला संबोधित करतांना सांगितले की, पर्यावरणाचा समतोल राखून जीवसृष्टीची समृद्धी करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले बहुमोल विचार मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलपल्ली वनविभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

Comments are closed.