Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहरात बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा 17 ऑगस्ट :-  भंडारा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात बुधवारी सकाळी साडेदहा च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला बिबट दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी त्यांच्या चमुसह घटना स्थळी पोहचून संपूर्ण परिसरात शोध घेतले असता वन अधिकार्‍यांना या परिसरात बिबट्याचे पग मार्क आढळले मात्र बिबट दिसला नाही. जो पर्यंत बिबट्याच्या शोध लागत नाही तो पर्यंत परिसरातील लोकांनी या भागात येऊ नये असे आव्हान वन विभागाद्वारे करण्यात आले आहे. हा बिबट 12 ते 15 वयोगटातील असल्याने या वयातील बिबट अधिक चपळ आणि घातक असतात त्यामुळे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

समोरासमोर दिसला बिबट.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भंडारा शहराच्या शेवटच्या भागावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विनायक देशमुख नावाचे सुरक्षा रक्षक हे त्याच्या चौकशी कक्षात बसले असता 100 फुटावर त्यांना अचानक एक बिबट दिसला. बिबट्याला पाहता क्षणी त्यांनी त्यांच्या चौकशी कक्षाचा दार लोटून घेतला आणि बिबट्याला पळविण्यासाठी जोराने ओरडायला सुरुवात केली त्यांचा आवाज ऐकताच बिबट्या क्षणार्धात समोर असलेल्या आवार भिंतीवरून दोन तारांच्या मधून उडी घेत पळून गेला.

शासकीय दुग्ध उत्पादक संस्थेचा परिसरात शोध मोहीम.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बिबट्या पळून गेल्यानंतर लगेच याची माहिती देशमुख यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिली तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्याची माहिती देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी हे लगेच घटनास्थळावर पोहोचले आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. वनविभागाच्या चमू ने संपूर्ण परिसरात या बिबट्याचा शोध घेतला असता त्यांना या परिसरात बिबट्याचे पगमार्क विविध ठिकाणी आढळून आले मात्र संपूर्ण परिसरात बिबट्या कुठे आढळून आला नाही. एवढंच काय तर ड्रोनच्या माध्यमातूनही बिबट्याचा शोध घेण्यात आला मात्र अद्याप तरी बिबट कुठेही आढळून आला नाही. हा बिबट 12 ते 15 वयोगटातील बिबट असल्याने हा अधिक चपळ आणि घातक असतो त्यामुळे जोपर्यंत या बिबट्याचा शोध घेतला जात नाही तोपर्यंत दूध उत्पादक संस्थेच्या बंद परिसरात नागरिकांनी येऊ नये असा इशारा वन विभागातर्फे देण्यात आलेला आहे.

अगदी नागरिक परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा बिबट्या आय टी आय च्या परिसरातून नेमका कुठे गेला याचा शोध सध्या वनविभाग घेत आहे. मात्र तोपर्यंत भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खोट्या अफवा न पसरविता जर कोणाला बिबट्या आढळून आल्यास त्याची माहिती वन विभागाला द्यावी अशी विनंती वन विभागातर्फे नागरिकांनाही करण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा :-

Comments are closed.