Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉक्टरांचा हलगर्जीपणा बनला रमा भुरे हिच्या मृत्युचे कारण .

दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

तिरोडा, 13,ऑक्टोबर :- तिरोडा येथील रहिवाशी रमा ईशांत भुरे हिला १९ मे रोजी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे बाळंतपणा करता दाखल केले असता येथील कर्मचाऱ्याचे सल्ल्यावरून रमा हिस रहांगडाले नर्सिंग होम तिरोडा येथे दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे कार्यरत डॉक्टर सायस केंद्रे यांनी सिझरिंन केले . मात्र सिझरिन नंतर या महिलेची प्रकृती बिघडली. तिला गोंदिया येथील श्रीराधे कृष्ण हॉस्पिटल येथे दाखल केले असता तिचा २० मे रोजी सकाळी १०.३० चे दरम्यान मृत्यू झाला. तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

मात्र रमा ईशांत भुरेचे पती इशांत भुरे यांनी तिरोडा पोलिसात तक्रार देऊन माझे पत्नीचे मृत्यूस येथील डॉक्टर कारणीभूत असल्याने त्यांचेवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. तिरोडा पोलिसांनी वैद्यकीय अधिष्ठाता गोंदिया यांना पत्र देऊन याबाबत अहवाल देण्याची विनंती केल्यावर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. श्रीकांत मेश्राम, डॉ.राजश्री पाटील, डॉ. विपुल अंबुले, डॉ. नंदकिशोर जयस्वाल यांची समिती नेमण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या समितीतर्फे देण्यात आलेल्या अहवालानुसार सिझरिंन नंतर या महिलेची योग्य प्रकारे देखभाल न झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तिरोडा पोलीस स्टेशन येथे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे कार्यरत डॉ.सायास हरिभाऊ केंद्रे व रहांगडाले नर्सिंग होम चे डॉक्टर सुशील सुखदेव रहांगडाले यांचे विरोधात भादवी कलम ३०४ अनवये गुन्हा नोंद करून पुढील तपास हवालदार नितेश बावणे करीत आहेत.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षलचे पुरून ठेवलेले साहित्य हस्तगत करून केले निकामी.

 

Comments are closed.