Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आधार कार्ड अपडेट करणेसाठी विशेष मोहिम

ऑनलाईन अपडेट प्रक्रिया दि.१५ मार्च पासून तीन महिने मोफत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली,  2 मार्च :- ज्या आधार कार्डधारकांनी १० वर्षा अगोदर आधार कार्ड काढलेले आहे व अजूनही आधार कार्ड अद्यावत केलेले नाही अशा सर्व आधार कार्ड धारकांनी आपल्या ओळखीच्या व पत्त्याच्या पुराव्यासह आधार कार्ड मध्ये दस्ताऐवज अद्यावत करणे आवश्यक आहे. जेणेकरुन विविध योजनांच्या लाभांपासून वंचित रहावे लागणार नाही. आधार कार्ड दस्ताऐवज अद्यावतीकरणाकरीता ओळखीचा पुरावा जसे मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्राईव्हींग लाईसन्स, पासपोर्ट, राशनकार्ड, शासकीय सेवेचे ओळखपत्र, जॉब कार्ड यापैकी कोणतेही एक व पत्त्याचा पुरावा जसे राशन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबूक, विद्युत बिल, टेलीफोन बिल, गॅस कनेक्शन बिल यापैकी कोणतेही एक पुराव्यासह आपल्या जवळच्या शासकीय आधार नोंदणी केंद्रावर जाऊन आधार कार्ड अद्यावत करावे असे आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

आधारकार्ड यु.आय.डी.ए.आय. च्या मायआधार पोर्टलवरुन स्वत: दस्ताऐवज अद्यावत केल्यास रु. २५/- ऐवढे शुल्क आहे. परंतू आता अधिकाधिक रहिवाशांना त्यांचे नवीन माहिती आधार मध्ये अद्यावत करणेकरीता प्रोत्साहित करणेसाठी दिनांक १५ मार्च ते १४ जून २०२३ या तीन महिण्यांचा कालावधीसाठी माय आधार पोर्टलव्दारे सेवा मोफत देण्याचा निर्णय यु.आय.डी.ए.आय. यांनी घेतलेला आहे. तरी जास्तीत जास्त रहिवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा. आधारकार्ड प्रत्यक्ष शासकीय आधार नोंदणी केंद्रावरुन अद्यावत केल्यास रु. ५०/- ऐवढे शुल्क आकारण्यात येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हयातील आधार नोंदणी केंद्र – अहेरी तालुक्यात पंचायत समिती कार्यालय अहेरी, ग्रामपंचायत कार्यालय जिमलगट्टा, ग्रामपंचायत कार्यालय आल्लापल्ली येथे आहे. आरमोरी तालुक्यात तहसील कार्यालय आरमोरी, पंचायत समिती कार्यालय आरमोरी, ग्रामपंचायत कार्यालय, देलनवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, देलोडा व महसूल मंडळ कार्यालय, वैरागड येथे आहे. भामरागड तालुक्यात तहसील कार्यालय भामरागड व पंचायत समिती कार्यालय भामरागड येथे केंद्र आहे. चामोर्शी तालुक्यात नगरपंचायत कार्यालय चामोर्शी, ग्रामपंचायत कार्यालय आष्टी, पंचायत समिती कार्यालय चामोर्शी, ग्रामपंचायत कार्यालय घोट, ग्रामपंचायत कार्यालय लखमापूर बोरी व ग्रामपंचायत कार्यालय भेंडाळा येथे आहे. धानोरा येथे तहसील कार्यालय धानोरा, पंचायत समिती कार्यालय धानोरा व ग्रामपंचायत कार्यालय पेंढरी ला आहे.

देसाईगंज तालुक्यात तहसील कार्यालय देसाईगंज व ग्रामपंचायत कार्यालय कोंढाळा येथे आहे. एटापल्ली तालुक्यात तहसील कार्यालय एटापल्ली, पंचायत समिती कार्यालय एटापल्ली व ग्रामपंचायत कार्यालय कसनसूर येथे सुविधा आहे. कुरखेडा तालुक्यात नगर पंचायत कार्यालय कुरखेडा, ग्रामपंचायत कार्यालय मालेवाडा, ग्रामपंचायत कार्यालय पुराडा व तहसील कार्यालय कुरखेडा येथे केंद्र आहे. गडचिरोली तालुक्यात नगर परिषद कार्यालय गडचिरोली, पंचायत समिती कार्यालय गडचिरोली, ग्रामपंचायत कार्यालय अमिर्झा व ग्रामपंचायत कार्यालय, मुरखळा (नवेगाव) येथे सुविधा आहे. मुलचेरा तालुक्यात नगर पंचायत कार्यालय मुलचेराला केंद्र आहे. सिरोंचा तालुक्यात तहसील कार्यालय सिरोंचा, ग्रामपंचायत कार्यालय अंकिसा ला आहे. कोरची तालुक्यात तहसील कार्यालय कोरची व पंचायत समिती कार्यालय कोरची येथे आधार केंद्र आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.