Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आज अहेरी येथून राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद कार्यक्रमाचा प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २८ जानेवारी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार संवाद कार्यक्रमाचे शुभारंभ अहेरी येथून होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील गुरुवार 28 जानेवारी अहेरीत पोहचणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांनी माहिती दिली आहे.

सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे गृहमंत्री ना.अनिल बाबू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख, युवा नेते ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा निरीक्षक चंद्रपूर जिल्हा शाहीन भाभी हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेलंगणा राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र सामला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्थानिक इंडियन पॅलेस फ़ंक्शन हॉल येथे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील पदाधिकारी, पक्षाचे फ्रंटल व वेगवेगळ्या सेलचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे श्रीनिवास विरगोनवार यांनी म्हटले आहे.

Comments are closed.