Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करीता एकविध क्रीडा संघटनेमार्फत अहवाल सादर करणेबाबत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.15 जून: राज्याचे क्रीडा धोरण 2012 नुसार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१२वी) च्या परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्याना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे कार्यपध्दतीबाबत सुधारीतशासन निर्णयामधील परिशिष्ठ 4 व 5 अन्वये एकविध खेळाच्या जिल्हा व राज्यसंघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांना स्पर्धा विषयक अहवाल दि. 21 जून 2021 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

यामध्ये धर्मदाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणी अधिनियम 1860 किंवा मुंबईसार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी प्रमाणपत्र, जिल्हा क्रीडा संघटना राज्य क्रीडा संघटनेस संलग्न असले बाबतचे पत्र, जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचा संपुर्ण अहवाल, सहभागी संघाची यादी, सहभागी खेळाडूंची यादी. (शासन निर्णयामधील परिशिष्ठ 10 नुसार), स्पर्धेची भाग्यपत्रीका, स्पर्धेचे अंतीम निकाल, स्पर्धाआयोजनाचे परिपत्रक, राज्य संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची शाहीची सही व शिक्कासह नमुना स्वाक्षरी असलेले पत्र, वरील प्रमाणे सर्व कागदपत्र एकविध क्रीडा संघटनांनी वेळेत सादर न केल्यास संबंधीत खेळाडूंचे प्रस्ताव गुणांकनास अपात्र राहतील व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत क्रीडा संघटनेची राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तरी जिल्हा संघटनांनी वरीलप्रमाणेअहवाल दि. 21 जून 2021 पर्यंत सादर करावा असे  घनश्याम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खेरवाडी सोशल वेल्फेअर मुंबई अंतर्गत ४ कुरमा घरांचे लोकार्पण सोहळा

शेतकऱ्यांच्या बोनससाठी खा. अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा

 

 

Comments are closed.