Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मेळघाटमध्ये २ बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती 7 डिसेंबर :- अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह वनपरिक्षेत्रांतर्गत असेरी बीटमधील वन खंड क्रमांक १६९ मध्ये चार ते पाच वर्षे वयाचा नर बिबट आणि दीड ते दोन वर्षे वयाची मादी बिबट वेगवेगळय़ा ठिकाणी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  मेळघाटच्या सिपणा वनपरिक्षेत्रातील सिमाडोह या अतीसंरक्षित भागात, ५०० मीटर अंतरावर बिबट्यांचे मृतदेह आढळले आहे. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, व्हायरल संसर्गामुळे बिबट्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात दोन्ही मृतदेहाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अहवालानंतर बिबट्यांचा मृत्यू कश्याने झाला हे स्पष्ट होणार आहे.

शवविच्छेदनादरम्यान या बिबटय़ांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृत बिबटय़ांचे सर्व अवयव शाबूत असून त्यांच्या शरीरावर कुठलीही जखम आढळून आली नाही. या बिबटय़ांचा मृत्यू साप चावल्याने किंवा एखाद्या अज्ञात आजाराने व शारीरिक अंतर्गत दुखापतीने झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय विषप्रयोगाची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. मृतावस्थेत आढळून आलेल्या दोन बिबटय़ांच्या पार्थिवावर सेमाडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अतुल प्रभाकरराव कडू आणि वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार पार पडले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.