Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा संशयास्पद मृत्यू ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14,ऑक्टोबर :-  महाराष्ट्र्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा गेले दोन दिवस NDRF टीम आणि स्थानिक गिर्यारोहन यांची टीम शोध घेत होती. अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घोरपडे बेपत्ता झाले होते. शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पुणे येथील कार्यालयातुन बाहेर निघाले होते. मात्र घरी आले नाहीत म्हणून, त्यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी शोध सुरू केला. त्यांची कार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोलनाका पास करून सातारा बाजूकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहीले असता शेवटचे लोकेशन सारोळा निरा नदीपुलाचे लोकेशन होते. व घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची कार क्र. एमएच 11 सीडब्ल्यू 4244 ही कार देखील पुला नजीकच्या हॉटेल समोर मिळाली होती, त्यानुसार घोरपडे यांच्या बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात बेपत्ता होण्याची खबर नोंदवली होती. त्यानंतर तपास सुरू केला असता त्यांचा मृतदेह सापडला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखेर प्रा.साईबाबा निर्दोष..

Comments are closed.