Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…..आणि चक्क तहसीलदारांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला

आदिवासींची मने जिंकली : प्रशासकीय अधिकारी संस्कृतीशी समरस झाल्याचा दिला संदेश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

कोरची, दि, २५ जानेवारी : वर्षभर कार्यालयीन कामे आणि कर्तव्यवस्था कर्तव्यात व्यस्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी महसूल विभागाने १७ ते २० जानेवारी दरम्यान मैदानी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातच अतिदुर्गम आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त कोरचीचे प्रभारी तहसीलदार सोमनाथ माळी यांनी रेरेला रेरेला या आदिवासी सुप्रसिद्ध व प्रख्यात नृत्यावर ठेका धरुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

गडचिरोली जिल्ह्याला आजवर तीन ” पी ” चा शॉप आहे. त्यात पनिशमेंट, प्रोबेशनर आणि पेंशनर चा आवर्जुन समावेश असतोच.त्यामुळे यातुन आलेला अधिकारी वा कर्मचारी कधीच “स्ट्रॉंग डिसिजन” न घेता केवळ टाईमपास’ धोरण अवलंबित असतात.बोटावर मोजता येतील,एवढेच काही अधिकारी येतात.ते जिल्ह्यात जनतेपुढे आवासुन उभ्या असलेल्या ज्वलंत समस्यांचे आवाहन स्वीकारुन समर्पितपणे निष्काम सेवा दिले आहेत. यापैकी कोरची तहसीलदार सोमनाथ माळी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुरखेडा महसूल उपविभागातील सांस्कृतिक कार्यक्रमात कर्मचाऱ्यांसोबत तालासुरात ठेका घेतल्याने ते सकारात्मक दृष्टीकोनातुन चांगलेच चर्चेत आले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे अडी-अडचणी समजून घेणारे व आदिवासींच्या रूढी परंपरा आणि धार्मिक वारसा व संस्कृतीचे जतन करणाऱ्या तहसीलदारांनी गडचिरोली जिल्ह्यात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करण्यासाठी आलेले पश्चिम महाराष्ट्र कोकणातले बरेच अधिकारी शिक्षा म्हणून नोकरी करतात.आपला वेळ मारुन नेतात. पण गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांची एकरूप होऊन आदिवासींचा विकासासाठी तळमळ असणारे प्रशासकीय अधिकारी बोटावर मोजता येतील इतकेच असतात.मात्र, आदिवासींच्या पारंपारिक गाण्यांवर त्यांच्याच वेशभूषेत नृत्य करुन आदिवासी व जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांच्यासोबत कुरखेडा व कोरची तहसीलदार सोमनाथ माळी नृत्याच्या ठेका घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांची मने जिंकली आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

झाडीपट्टीतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस यांना मा. राष्ट्रपती यांचे ” पोलीस शौर्य पदक” जाहीर

लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी, संजय मीणा

 

 

Comments are closed.