Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यानी उच्य शिक्षित साईनाथची हत्या केल्याने कुटुंबातील आधार हरपला-ॲड. अविनाश काळे

शासनाने 50 लाखांचे नुकसान भरपाई द्यावी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नागपूर, ,15 मार्च :- नक्षलवाद्याकडून दमननितीचा अवलंब करत निरपराधी वनवासी बांधवांची सातत्याने हत्या केली जात आहे. नक्षल्यांकडून होत असलेला हा रक्तपात कधी थांबणार, सरकार याची दखल का घेत नाही. नक्षल्यांचा नि:पात करण्यासाठी सरळ सरळ आदेश का देत नाही, असा सवाल जन संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी आज उपस्थित केला.

शुक्रवारी ०८ मार्च रोजी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या साईनाथ चौतू नरोटी, रा मरर्दुल, ता भामरागड या विद्यार्थ्याची नक्षल्यांनी निर्घृण हत्या केली. या घटनेच्या विरोधात जन संघर्ष समिती व बिरसा मुंडा विचार मंच ,नागपूरच्या वतीने बुधवारी संविधान चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात युवा चेतना मंच, भारतीय विचार मंच आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साईनाथचा हकनाक बळी गेला आहे. मात्र, याची दखल केवळ बातमीपुरतीच घेतली गेली. एक तरुण विद्यार्थी देशद्रोह्यांच्या हातून मारला जातो आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरविण्याचे कार्य केले जाते. मात्र, या घटनेचे पडसाद कुठेच उठलेले दिसत नाही. संसद असो वा विधिमंडळ, कोणत्याच नेत्याने या घटनेचा निषेध नोंदवलेला नाही.एवढेच नव्हे तर स्थानिक नेते, खासदार, आमदार, मंत्र्यांनीही या घटनेबाबत एकही शब्द काढलेला नाही.आदिवासींच्या हत्येची दखल घेतली जात नसेल तर वनवासी क्षेत्राबाबत राजकारण्यांमध्ये आस्थाच नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे दत्ता शिर्के यावेळी म्हणाले.

नक्षल्यांनी ज्या प्रकारे साईनाथ नरोटीची निर्घृण हत्या केली, ती हत्या निंदनिय आहे. साईनाथ हा आपले विद्यार्थी ध्येय पूर्ण करण्यासाठी विरगतीला प्राप्त झाला आहे. त्याच्या कुटूंबीयांना शासनाने नुकसानभरपाई म्हणून ५० लाख रुपये व वनवासींना संरक्षणाची हमी द्यावी, अशी मागणी संविधान सतर्कता समिती चे ॲड. अविनाश काळे यांनी यावेळी केली. केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी देशातून ७० टक्के नक्षलवाद संपल्याचे जाहीर केले. परंतु, अजूनही नक्षल्यांकडून आदिवासींची हत्या होत आहे. हे पोलिसांचे अपयश असून, पोलिसांनी आता कठोर पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे मत भारतीय विचार मंचाचे सुनिलजी किटकरू यांनी यावेळी व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी युवा चेतना मंचचे अध्यक्ष दिलीप दिवटे, बिरसा मुंडा मंच चे आकाश मडावी, राहुल महाजन, कमलेश धनविजय, ऍड भाग्यश्री दिवाण, मुकुंद खडतकर, पावन डहाके, प्रकाश केवडे, युवा चेतना मंच उपाध्यक्ष महेश महाडिक, विवेक सूर्यवंशी, भूषण वानखेडे, आशिष खडके, विशाल बोडखे, तेजस गोंधळेकर, आशिष चौधरी सुहास बांगडकर, शुभम गायधने, जन संघर्ष समितीचे रितेश बडवाईक, प्रशांत शेंडे, प्रज्वल अवचट, रोशन तईकर, भावेश मशिदकर, उपस्थित होते.

हे पण वाचा :-

जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक

नक्षल्यांनी उच्चशिक्षित तरुणाची केली हत्या !

 

Comments are closed.