Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी राजनगरीतील एकमेव पुरातन शिवमंदिराचे होणार जीर्णोद्धार

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३० डिसेंबर: अहेरी राजनगरी व परिसरातील शिवभक्तांच्या आस्थेचें केंद्र असलेल्या, अहेरी राज परिवाराच्या मालकीचे मुख्य चौकातील 100 वर्ष जुन्या शिवमंदिराचे जीर्णोद्धार करून नवीन शिवमंदिर बांधण्याचे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी ठरविले आहे, त्यानुसार 28 डिसेंबर 2020 सोमवारला सकाळी 9 वाजून 21 मिनिटाच्या शुभमुहूर्तावर राजपुरोहित ओंम्कार महाराज यांच्या मंत्रोच्चारात भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

100 वर्ष जुने शिवमंदिर असल्याने दर पावसाळ्यात (श्रावण महिना) ह्या मंदिरात पाणी भरून भक्तांना दर्शन घेण्यासाठी मोठी गैरसोय होत होती, ह्याची दखल घेत जुन्या मंदिराच्या ठिकाणीच नवीन अद्यावत शिवमंदिर बांधण्याच्या संकल्प राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी युवा नेते रामेश्वरराव आत्राम, अवधेशराव आत्राम, प्रविणराव आत्राम, भोसले सर, प्रकाश सावकार गुडेल्लीवार, रमेश कस्तुरवार, उमेश गुप्ता, लिंगम दोंतूलवार, रवी नेलकुद्री, पप्पु मद्दीवार, अमोल गुडेल्लीवार, मुकेश नामेवार, श्रीनिवास चटारे, शँकर मगडीवार, प्रशांत नामनवार, दिलीप पडगेलवार सह अनेकांची उपस्थिति होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.