Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुस्लिम समाजावरील अत्त्याचार थांबवण्यासाठी वंचितच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 10 जुलै – राज्यात दिवंसेदिवस मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराची मालिका सुरू आहे परंतु अत्त्याचार करणा-यांचा बंदोबस्त करून कायदेशीर कारवाई करण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याने जातीय हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात व बिड येथे पोलिस कस्टडीत पोलिसांच्या मारहाणीत जरिन खानच्या मृत्युस जबाबदार असणा-या पोलिसांवर ३०२ चा गुन्हा दाखल करून संबंधीत अधिका-यांची चौकशी करून दोषी अधिका-यांना बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आले.

वंचितच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्च्याची सुरूवात येथिल ईंदिरा गांधी चौकातून दुपारी एक वाजता करण्यात आली व दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहचताच पोलिसांनी बॅरिकेटस् लावून मोर्चा अडवला यावेळी मोर्च्याचे रुपांतर सभेत होऊन वंचितच्या पदाधिका-यांनी मोर्चेक-यांना संबोधीत केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी मुस्लिम समाजावर होणा-या अत्त्याचाराच्या घटणेचा पाढा वाचला परंतु एकाही अत्त्याचारग्रस्त मुस्लिम व्यक्तीला न्याय मिळाला नाही राज्य सरकार जाणून बूजून मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे, समाजकंठकावर कायदेशीर कारवाई कां केल्या जात नाही? जर मुस्लिम समाजावर होणारे हमले सरकार पुरस्कृत आहेत कां ? नसतील कायदेशीर कारवाई कां केल्या जात नाही, कां केल्याजात नाही याचा उत्तर सरकारनी दिले पाहिजे, सरकारचे षडयत्र जनतेने समजून घेतले पाहिजे असेही ते म्हणाले.

वंचितच्या नेतृत्वातील मोर्च्यात मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यासाठी मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यासोबतच ओबिसी, दलित, आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते हे या मोर्च्याचे वैशिष्ठ्य होते. मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, बाशिद शेख, जी के बारसिंगे, लतिफ पठाण, प्रज्ञा निमगडे, रहिम शेख, रफिक शेख, अयुब शेख, सलमान पठाण, योगेंद्र बांगरे, मंगलदास चापले, मालाताई भजगवळी, दिलीप बांबोळे, जावेद अलवी, झहिर अन्सारी, विलास केळझरकर, कृष्णा रोहनकर, यास्मिन शेख भिमराव शेंडे, जावेद शेख, कवडू दुधे, सुरज खोब्रागडे, जीतू खोब्रागडे, अतिया पठाण, अक्षा खान, नशिकेत रामटेके, शोभा शेरकी, वंदना येडमे, मनोहर कुळमेथे, अक्षय तावाडे आदिंनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :- 

Comments are closed.