Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचा येथे भाजपाचे जनसंपर्क अभियान खासदार अशोक नेते यांची उपस्थिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 12 सप्टेंबर:

भारतीय जनता पार्टी तालुका सिरोंचा च्या वतीने  आज दि 12 सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियान पार पडला. भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत जनसंपर्क अभियान राबविण्यात आला. यावेळी मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, राष्ट्रीय परिषद सदस्य सत्यनारायण मंचारलावार, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, तालुका महामंत्री माधव कासरलावार, माजी तालुका अध्यक्ष कलाम हुसेन, बांन्नया बेडके, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
    यावेळी खासदार अशोक नेते यांनी पक्षाचे संघटन मजबूत करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.