Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरकोंडा येथील पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.

सिरकोंडा परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली 27 फेब्रुवारी:- सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गंगानूर टोला व कोतागुडम येथील नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाला 39 लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आले. या पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन सोहळा सिरकोंडा येथे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सिरकोंडा येथील गंगानूर टोला व कोत्तागुडम नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील आदिवासी बांधव व नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात नाहक त्रास होत होता. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतः नाल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केले होते. व या नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत सिरकोंडा येथे पूल वजा बंधारा बांधकामासाठी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले.जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी सिरकोंडा येथील जनतेला दिलेल्या ग्वाही एक वर्षाचे आत पूर्ण केल्याने येथील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


सिरोंचा तालुक्यातील एकही नाल्यावर आजपर्यंत पूल वजा बंधारा बांधकाम करण्यात आले नाही मात्र जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी जेंव्हा गंगानूर टोला या नाल्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांना ये -जा करण्यासाठी पूल व परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिल्यास पावसाळ्यात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून पहिल्यांदाच तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम सिरकोंडा येथे होत आहे.या पूल वजा बंधारा बांधकामाची येत्या पावसाळ्यात परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांना याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.


पूल वजा बंधारा बांधकाम भूमिपूजन सोहळा प्रसंगी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या समवेत आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,माजी उपसरपंचअशोक येलमुले ,सिरकोंडा ग्रा.पं. चे सरपंच लक्ष्मण विजा गावडे ,उपसरपंच मुल्ला गावडे,झिंगाणूर ग्रा.प.सरपंच कारे मडावी,उपसरपंच शेखर गन्नारपू, बामणीचे सरपंच अजय आत्राम,आविस सल्लागार रवी सल्लम,नागराज इंगीली, गरकापेठा चे सरपंच सुरज मडावी,नारायणपूर चे उपसरपंच अशोक हरी, माजी सरपंच मासा मडावी,मदाराम चे माजी सरपंच इरफा मडावी,नारायण मुडीमडीगेला,राजांना दुर्गम,दुर्गेश लंबाडी,प्रशांत गोडशेलवार,साई मंदा,माजी सरपंच निलाबाई गावडे, जलसंधारण विभागाचे अभियंता उंदिरवाडे, तलाठी राहुल पोरतेट, ग्रामसेविका वाय. एम.कोरेठी, ग्रामसेवक रणजित राठोड सह नागरिक ,शेतकरी बांधव व आविस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Comments are closed.