Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरिफा मुल्ला ठरल्या ग्लॅमन मिसेस इंडिया

पोलीस दलासाठी कौतुकास्पद कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली, दि. २४ सप्टेंबर : पोलीस दलात राष्ट्र सेवेचे काम करीत असताना इतर स्पर्धात्मक जगात तितक्याच ताकदीने वावरणाऱ्या आणि यश प्राप्त करणाऱ्या आरिफा मुल्ला ह्या थायलंड येथे झालेल्या ग्लॅमन मिसेस इंडिया स्पर्धेत विजेत्या ठरल्या आहेत.

या स्पर्धेच्या यशस्वी सफलते नंतर आरिफा मुल्ला या सांगलीत प्रथमच दाखल झाल्या आहेत. सांगली सीआयडीच्या पोलीस उपअधीक्षक असणाऱ्या आरिफा मुल्ला याशिवाय त्या स्पर्धेतील बेस्ट पर्सनॅलिटीच्या उपविजेत्याही ठरल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

थायलंड मधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती . १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा झाल्या. मुल्ला यांनी या स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे दिली होती. फिल्मफेअर मिडल इस्ट च्या ग्लॅमन या कंपनी तर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं, त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली.लाज वाटली पाहिजे – तानाजी सावंत

राज्यात ट्विट- एडिटिंगमुळे राजकीय वातावरण तप्त.

 

 

Comments are closed.