Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर :  दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावण्यात दिल्ली पोलिसांना  यश आले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना माहिती मिळताच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ट्रॅप लावला होता. सोमवारी रात्री 10 च्या दरम्यान सरायकाले खां येथील मिलिनियम पार्कजवळ जैश-ए-मोहम्मदच्या दोन्ही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तसेच या दोन दहशतवाद्यांकडून काही हत्यारंही ताब्यात घेण्यात आली आहेत. 

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोन दहशतवाद्यांपैकी एक जम्मू-काश्मीरच्या बारामुला आणि एक कुपवाडा जिल्ह्यातील राहणारे आहे. अब्दुल लतीफ आणि मोहम्मद अशरफ खटाना अशी त्यांची नावं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी या दोन्ही दहशतवाद्यांकडून ऑटोमेटिक पिस्टल, 10 जिवंत काडतूस आणि काही कागदपत्र जप्त करण्यात आले. यात दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी घातपात घडवण्याचा कट होता. या दोघांना अटक करण्यात आली असून चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments are closed.