Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एक विद्यार्थी एक झाड सामाजिक वनीकरणाचा स्तुत्य उपक्रम

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली यांच्या संकल्पनेतून पुढाकार...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ४ जून : दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो, या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याचे काम शासनाचे वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत नियमित केल्या जात आहे. स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव व वनमहोत्सव कालावधीचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली तसेच नवयुग विद्यालय गुरवळा (राखी) या राष्ट्रीय हरित सेना शाळेच्या माध्यमातून गुरवळा (राखी) या गावांत शाळेतील इयत्ता आठवी ते दहावी चे विध्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सामाजिक वनीकरण गडचिरोली परिक्षेत्रातील अधिकारी/ कर्मचारी यांचे मार्फतीने वृक्षदिंडी व वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

वृक्षदिंडीचे माध्यमातून गावात वन व पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली, तसेच शाळेच्या परिसरात वृक्षांची लागवड विध्यार्थ्यामार्फतीने करुन घेवून शासनाचा एक विध्यार्थी एक झाड हि संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात आली. सदर कार्यकमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून गुरवळा ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सौ. दर्शना भोपये, संरपच ह्यांची प्रमुख उपिस्थती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शालेय परिसरात वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्षांचे संरक्षण व संगोपनाबाबत विध्यार्थ्यांकडून वृक्ष प्रतिज्ञा वधवून घेण्यात आली व त्यांनतर शाळेचे मुख्याध्यापक एम. एस. कवठे, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरेाली मधील धिरज ढेंबरे तसेच शितल बा. खुळसंगे यांनी शाळेतील विध्यार्थ्यांना वन व पर्यावरणाचे महत्व व त्याची जोपासना याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे यशस्वीततेकरिता शाळेतील विध्यार्थी, शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी, परिक्षेत्रातील क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू.

 

Comments are closed.