Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बॉलीवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री लॉकडाऊनमुळे काम गेल्याने करीत होत्या वेश्याव्यवसाय!

ठाणे पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिट १ ने ही कारवाई केली असुन २ अभिनेत्रींसह २ महिला एजंट आणि १ पुरुष एजंटला केली अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट १ ने एक मोठी कारवाई केली असून या कारवाईत ठाणे क्राईम ब्रँच युनिट एक ने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या. याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करत होत्या. वेश्या व्यवसाय करतांंना दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या. यावरून असे लक्षात येते की, यांना मागणी करणारे देखील श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा शोध देखील ठाणे क्राइम ब्रांच करीत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सिरीयल मध्ये मुख्य रोल या दोन्ही अभिनेत्रींनी केले आहेत.

सध्या covid-19 मुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण देखील बंद आहे. अशातच आपले महागडे चोचले पुरवण्यासाठी या अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळाल्या आहेत. अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

वेश्या व्यवसायातून लाखो रुपये कमवून आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता हे सगळं केलं जात होते. याकरीता फक्त या दोन अभिनेत्रीच नाही तर आणखीन बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्या वेश्या व्यवसाय करतात या दोघींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधील तसंच टाॅलिवूडमधील अनेक अभिनेत्री मुंबई आणि ठाण्याच्या वेश्या व्यवसाय एजंटच्या संपर्कात आहेत. अनेक एक हाय प्रोफाईल त्याचपद्धतीने श्रीमंत व्यक्तींकडून या अभिनेत्रींची वेश्या व्यवसाय करता मागणी केली जाते.

त्यामुळे ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट १ केलेल्या कारवाईची लिंक ही फक्त ठाणे मुंबई पुरतीच सिमित नसून इतर राज्यात देखील असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार ठाणे क्राईम ब्रँच युनिट एक तपास करीत आहे.

या दोन्ही अभिनेत्रींसोबत ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट १ ने एक पुरुष एजंट तर दोन महिला एजंटला अटक केलेली आहे. यांच्याकडून यांचे मोबाईल जप्त केले असून या मोबाईल मध्ये अनेक मोठ्या अभिनेत्री मॉडेल आणि ब्युटी क्वीन यांचे फोटो सापडलेले आहेत.  सापडलेले फोटो आणि त्या फोटोत असलेल्या अभिनेत्री मॉडेल ब्युटी क्वीन या वेश्याव्यवसायात होत्या की नाही. याची शहानिशा करण्याकरीता ठाणे क्राइम ब्रांच तर्फे फोटोतील या सर्व अभिनेत्री मॉडेल आणि ब्युटी क्वीन यांची देखील चौकशी करणार असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचा देखील या सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या काळात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना ठाणे क्राइम ब्रांचच्या चकरा माराव्या लागणार हे निश्चित…

हे देखील वाचा :

चंद्रपूर ब्रेकिंग : वीज पडून दोन मेंढपाळाचा दुदैवी मृत्यू

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत

भरधाव स्कारपीओ वाहनाने ४ वर्षीय चीमुकल्यास चिरडले

बिबट्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.