Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली चे खेळाडू चमकले राष्ट्रीय पातळीवर

राष्ट्रीय हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ दुसरा स्थानी आला असून या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याला 2 सुवर्ण, 3 रजत, पदके मिळाली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. ३१ मार्च :   उत्तर प्रदेशातील लखनौ येथील लालजी टंडन चौक स्टेडियम येथे २७ मार्चपासून आयोजित फर्स्ट हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्सची रंगीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा. आज समारोप झालेल्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशच्या संघाने २० सुवर्ण पदके, १० रौप्य पदके व ६ कांस्य पदकांसह विजेतेपद पटकावले, तर महाराष्ट्राने १७ सुवर्ण पदके, १६ रौप्य पदके व ११ कांस्य पदकासह द्वितीय विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर महाराष्ट्रतर्फे खेळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा सुमित खंडारे याला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात याला. यासोबतच HSFA,BULDHANA संघटनेचे अध्यक्ष विजय वाळेकर यांची भारतीय संघाच्या डेव्हलपमेंट कमिटीच्या डायरेक्ट पदावर नियुक्ती करण्यात आली.

सदर स्पर्धेत फाईट इव्हेंट मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील खेळाडू कु. रेशमा कोरसा आणि सुरेश मडावी सुवर्णपदक मिळाले तसेच कु. अनन्या सामलवार, काजल गुट्टे , सनी सलामे व यांना रजत पदक प्राप्त झाले, यामध्ये सर्व पदक विजेत्यांची १९ मे ते २३ मे दरम्यान उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात इटलीतील मिलान येथे होणाऱ्या प्रौढ (वरिष्ठ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या स्पर्धेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश ऑलम्पिक असोसिएशनचे असिस्टंट सेक्रेटरी, आनंद किशोर पांडे, डॉ इंद्रामणी, संचालक, पशुसंवर्धन विभाग, उत्तर प्रदेश सरकार आणि अभियंता अवनीश कुमार सिंग, सदस्य विधान परिषद, लखनौ विभाग, पदवीधर क्षेत्र, उत्तर प्रदेश आणि डॉ. वैभव प्रताप सिंग हे उपस्थित होते.

सदर राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल प्रशिक्षक, पंच आणि आयोजन समितीच्या सदस्यांचे HSFI, INDIA चे अध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी अभिनंदन करून सर्व खेळाडूंचे त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सचिव राहुल मेश्राम सर तसेच HSFA, त्याचे प्रशिक्षक रवी चेर्लावार सर यांनीं केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आलापल्ली बाजारवाडी येथील चिकन मटण मार्केट येथील अतिक्रमण हटाव व्यावसायिकांच्या विरोधानंतर लांबणीवर

राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान

 

Comments are closed.