Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली बाजारवाडी येथील चिकन मटण मार्केट येथील अतिक्रमण हटाव व्यावसायिकांच्या विरोधानंतर लांबणीवर

माजी आ.दिपक आत्राम, माजी जीप अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा अतिक्रमण हटाव ला विरोध.; आधी पर्यायी जागा द्या मगच अतिक्रमण हटवा अशी भूमिका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. ३० मार्च : आलापल्ली ग्रामपंचायत द्वारे आज मोठ्या गाजावाज्यात बाजारवाडी येथील अतिक्रमण काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला स्थानिक व्यावसायिकांच्या प्रखर विरोधानंतर पाच दिवस समोर ढकलण्यात आले आहे.

आलापल्ली येथील बाजारवाडी येथील मटण मार्केट ,चिकन मार्केट या ठिकाणीअनेक वर्षांपासून काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकान थाटले होते.हाकेच्या अंतरावर गणेश मंदिर असल्याने तसेच येथील स्थानिक नागरिकांनी मटण चिकन मार्केट मुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याची वेळोवेळी तक्रार केली होती.या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मटण चिकन मार्केट हटवीण्यात यावे अशी मागणी केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे ५ ते ६ वेळा या व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती.मात्र व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण हटविले नसल्याने अखेर आज ग्रामपंचायत तर्फे पोलीस बंदोबस्तात व महसूल विभागाच्या उपस्थिती मध्ये अतिक्रमण काढण्याचे नियोजन करण्यात आले.सकाळी ११ वाजता अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरुवातीला काही ठेले हटविल्या नंतर चिकन मटण मार्केटचे अतिक्रमण हटविण्याची वेळ आली तेव्हा या कारवाईला अतिक्रमणधारक व्यावसायिक व माजी आमदार दीपक आत्राम व माजी जीप अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विरोध करीत आधी मटण ,चिकन विक्रेत्यांना विक्रीसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी करून अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केला आधी पर्यायी जागा द्या मगच अतिक्रमण हटवा अशी भूमिका मांडून अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या जेसीबी समोरच ठिय्या आंदोलनाला बसले.

त्यानंतर आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम व ग्रामसेवक मस्के यांनी या प्रश्नी अतिक्रमण धारकांसोबत चर्चा करून अतिक्रमण हटविण्यासाठी पाच एप्रिल पर्यत वाढीव मुदत दिली असली तरी हा अतिक्रमण हटाव चा मुद्दा चिघळणार काय की अतिक्रमण हटणार याकडे आलापल्लीवासीयांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : 

भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत तीनजन जखमी

 

भिवंडीतमधील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली भेट

4 एप्रिल 2022 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

 

Comments are closed.