Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत तीनजन जखमी

अहेरीनजीकच्या लक्ष्मन नाल्याजवळील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. ३० मार्च : अहेरी ते प्राणहिता रोडवरील लक्ष्मण नाल्याजवळ विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या दोन दुचाकींची टक्कर होऊन दोन पोलीस कर्मचारी तर एक विद्यार्थी जखमी झाला.

जखमींमध्ये प्राणहिता पोलीस उपमुख्यलयातील मोहन काशिनाथ सोनकुसरे (५४), विठ्ठल बाजीराव तोरे, (५४) हे पोलीस कर्मचारी तसेच नागेपल्ली निवासी अभिजीत ओमप्रकाश गर्गम (२५)  यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस कर्मचारी हे आलापल्ली वरून अतिक्रमणावरील बंदोबस्त आटोपून अहेरीकडे  दुचाकी क्रमांक एम एच ३३ जे ४४०२ ने येत असताना अहेरी वरून अल्लापल्लीकडे विना नंबरची यामाहा कंपनीची दुचाकीने जात असतांना शंकरराव बेजलवार महाविद्यालय जवळील लक्ष्मण नाल्याजवळ दुपारी २.३० वाजता दोन्ही दुचाकींची टक्कर झाली.

यात पोलीस कर्मचारी मोहन हे गंभीर जखमी असून त्यांचा उजवा पाय तथा डोक्याला मार लागला असल्याने गडचिरोली येथे पुढील उपचारार्थ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातून रेफर करण्यात आले. सोबतचे जखमी पोलीस कर्मचारी विठ्ठल यांना अहेरीतच उपचार सुरू आहे. या अपघातात जखमी अभिजितला चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहेरी पोलीस स्टेशन मध्ये जखमी अभिजीत वर मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ तर भारतीय दंड संहिता २७९, ३३७ व ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अहिरे चे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

हे देखील वाचा : 

भिवंडीतमधील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली भेट

4 एप्रिल 2022 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान

 

Comments are closed.