Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: २०१८ च्या टीईटी परीक्षेतही मोठा घोळ, ५ कोटींचा आर्थिक व्यवहार; तिघांना अटक

2018 च्या टीईटी परीक्षेतही (TET Exam Scam) घोटाळा झाला होता, अशी माहिती पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल असलेल्या गुन्हयातील अटक आरोपी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख, त्याचे साथीदार एजंट नामे संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांचेकडे तपास चालू असताना तसेच शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२०२० संबंधी गुन्हयातील अटकेत असलेला अभिषेक सावरीकर यांचेकडे सखोल तपास केल्यानतंर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्येही त्यांनी तत्कालीन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेसह परीक्षांचे आयोजन करणारे जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बैंगलोर याचे तत्कालीन मॅनेजर त्याचे सहकारी यांचे संगनमताने अपात्र परिक्षार्थी कडून पैसे स्विकारून त्यांना परिक्षेच्या निकालात फेरफार करून पात्र दाखविल्याचे तपासात उघड झाले आहे.

पुणे डेस्क, दि. २१ डिसेंबर : २०१८ च्या टीईटी परीक्षेत घोटाळा झाला होता, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२०१८ मध्ये टीईटी परीक्षेतही घोळ झाला होता. त्यामध्ये गैरप्रकार झाली होती. आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता. १५ जुलै २०१८  ला परीक्षा झाली तर निकाल १२  ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळची परीक्षा नियंत्रक होते डेरे त्यांना अटक केली आहे. प्राथमिक अंदाजानुसारर ५०० लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार ५ कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ठळक मुद्दे :

  • TET २०१८ परीक्षेत निकालात फेरफार.
  •  पुणे पोलिसांच्या तपासात फेरफार झाल्याचं निष्पन्न.
  •  अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन केले गेले पात्र.
  • १५ जुलै २०१८ ला झाली होती परीक्षा.
  •  ५०० परिक्षार्थ्यांकडून ५० ते ६० हजार रुपये घेतल्याची माहिती.
  •  गोळा झालेले पैसे वाटून घेण्यात आले.
  • २०१८ साली सुखदेव डेरे होते परीक्षा परिषदेचे आयुक्त.
  •  डेरे, सुपे, देशमुख, सावरीकर, हरकळ बंधूनी पैसे वाटून घेतल्याची माहिती.
  • GA सॉफ्टवेअर कंपनीने निकाल जाहीर करताना केली फेरफार.
  • अपात्र विद्यार्थ्यांचे निकाल पात्र म्हणून केले अपलोड.
५०० परीक्षार्थींच्या निकालाशी छेडछाड, बनावट प्रमाणपत्रही दिली

टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपास सुरू असताना अनेक घोटाळे सामोर आले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या TET परीक्षा सूत्रधार सुखदेव डेरेला अटक केली आहे. तसेच अश्विन कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. ही लोक मार्कशीट कोरी ठेवायला लावत असत आणि निकाल बदलायचे. आतापर्यंत ५०० लोकांचा निकाल बदलला गेला आहे. त्यांना खोटी सर्टिफिकेट दिली गेली आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

टीईटी परीक्षेत गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने केली ही कारवाई 

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपेसह आणखीन दोन मोठे मासे गळाला लागले आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरेसह जी.ए सॉफ्टवेअर कंपनीचा २०१७ सालातील संचालक अश्विन कुमारला अटक केली. तर बीडमधून TET एजंट संजय सानपवर कारवाई करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेत गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात बडे मासे गळाला लागण्याचं सत्र सुरुच आहे. एकीकडे औरंगाबाद बोर्डाचा माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली असताना दुसरीकडे बंगलोरमध्येही पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने एकाला गजाआड केले आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या संचालकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अश्विनकुमार असं या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलीस पत्रकार परिषद घेऊन या दोघांच्याही भूमिकेविषयी खुलासा करणार आहेत. दिवसेंदिवस पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना बडे अधिकारी गळाला लागत आहेत. परीक्षा परिषदेचा अटकेत असलेला निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या चौकशीतून डेरे याचे नाव समोर आल्याचं समजत आहे. तर प्रितेश देशमुखच्या चौकशीतून अश्विनकुमारपर्यंत पुणे पोलिसांना पोहोचता आले आहे.

संजय सानपला आरोग्य भरती संदर्भात अटक

आरोग्य भरतीतसंदर्भात संजय सानपला अटक केली होती. संजय सानप हा दलाल म्हणून काम करत होता. भरपूर दलाल आहेत आम्ही चौकशी करत आहोत. सर्व गोष्टी सांगू शकत नाही, कोर्टाला माहिती देऊ, असं अमिताभ गुप्ता म्हणाले.

हे देखील वाचा : 

Exclusive Report .. “त्या ” अवैध उत्खनन प्रकरणी जप्त केलेल्या दोन पोक्लेन मशीनला दुसऱ्या ठीकाणी हलविताच वन विभागाने मोठ्या शिताफीने शोधून पोक्लेन मशीन घेतले आपल्या ताब्यात

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मध्ये १९० जागांसाठी भरती

गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती

धक्कादायक!! मोठ्या भावाने आपल्या लहान मतिमंद भावाची गळा दाबून केली हत्या!

 

 

Comments are closed.