Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले

सूरजागड लोहखनिज वाहतुकीचा आणखी एक बळी, कायम अपघात होत असतांनाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या आष्ठी वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला. सोनाक्षी मसराम (१२ रा. नांदगाव फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर) असे मृतक मुलीचे नाव आहे.

गडचिरोली, दि. १४ :  सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत १२ वर्षीय मुलगी ठार झाल्याची घटना आज आष्टी येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. सोनाक्षी मसराम असे मृत मुलीचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील नांदगाव फाटा येथील रहिवासी होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोनाक्षी ही आज दुपारी आपल्या मामासोबत एमएच ३४, एझेड ९५७५ क्रमांकाच्या मोटारसायकलने आष्टी येथून गोंडपिपरीकडे जात होती. मात्र, वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर मोटारसायकल स्लीप झाल्याने दोघेही खाली पडले. एवढ्यात मागून येणाऱ्या ट्रकने सोनाक्षीला जबर धडक दिली. यात ती जागीच ठार झाली. घटनेनंतर ट्रकचालक प्रसार झाला. या घटनेमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

आष्टी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. हा ट्रक सुरजागड येथून लोहखनिज घेऊन चंद्रपूर जिल्ह्याकडे जात होता अशातच दुचाकीला ट्रकनी जबर धडक दिली असता दुचाकीवरून मुलगी खाली पडल्याने सरळ चाकाखाली आल्याने जागीच गतप्राण झाली .मागील दीड वर्षांपासून या मार्गावर सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे .अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यावर काहीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

चीचडोह प्रकल्पात चार युवकांचा पाण्यात बुडू मृत्यू

Comments are closed.