Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतात सलग तीन आठवडे कोरोना रुग्णसंख्या वाढ स्थिरावली

देशात गेल्या तीन आठवड्यात तीन लाखांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत, मृत्यूदरही घटला कमी झाली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क ३० नोव्हेंबर  :- भारतातील कोरोना रुग्णसंख्येने 94 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 88 लाख 47 हजार 600 आहे. तर सध्या 4 लाख 46 हजार 952 रुग्णांवर देशभरात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत भारतात 1 लाख 37 हजार 139 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा वगळता इतर तीन आठवड्यांमध्ये नव्याने समोर आलेल्या रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी राहिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतामधील कोरोना रुग्णांच्या वाढती रुग्ण संख्या स्थिरावल्याचे दिसून आले. 22- 29 नोव्हेंबर दरम्यान 2 लाख 91 हजार 903 कोरोना रुग्ण आढळले होते. यापूर्वीच्या आठवड्यात 15-22 नोव्हेंबरमध्ये 2 लाख 92 हजार 475 तर 8 ते 15 नोव्हेंबरमध्ये 2 लाख 92 हजार 549 कोरोना रुग्ण आढळले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 7 तारखेदरम्यान 3 लाख 24 हजार 476 कोरोना रुग्ण आढळले होते.

जगाच्या तुलनेत मृत्यूदर कमी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.45 टक्के इतका आहे. जागतिक आकडेवारीचा अभ्यास केला असता सध्या भारतातील दहा लाख लोकसंख्येमध्ये 99 लोकांचा मृत्यू होत आहे. देशात कोरोना मृत्यूंची संख्या दरदिवशी 500 च्या खाली आलेली आहे. देशात 22 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 3388 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 15 ते 21 नोव्हेंबरच्या कालावधीत 3641 तर 8 ते 15 तारखेच्या दरम्यान 3476 जणांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्या अगोदर भारतात प्रत्येक आठवड्याला भारतात 4 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.

रविवारी ( 29 नोव्हेंबर) देशात 39 हजार 192 कोरोना रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी (27 नोव्हेंबर) 41 हजार 927 कोरोना रुग्ण आढळले होते.

Comments are closed.