Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑस्ट्रेलियाकडून दुसर्‍या वनडे सामन्यातही भारताचा पराभव.

ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली.

कोहली आणि राहुलची झुंजार खेळी. स्टीव्ह स्मिथचे सलग दुसरे शतक.

वृत्तसंस्था सिडनी, दि. २९ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या वन-डे सामन्यात भारताला 51 धावांनी पराभूत केले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फॉर्ममध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून 64 चेंडूत शतक झळकावले. याच खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विक्रमी 389 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ निर्धारित षटकांत केवळ 9 गड्यांच्या बदल्यात 338 धावा करू शकला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑस्ट्रेलियाकडून शानदार शतक झळकावणा स्मिथला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. स्मिथने 64 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावा केल्या. पहिल्या सामन्यात स्मिथने 105 धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले.

ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने सर्वाधिक 3 बळी घेतले. कमिन्सने 10 षटकांत भारताच्या तीन फलंदाजांना 67 धावांवर बाद केले. याशिवाय हेझलवुड आणि अ‍ॅडम जंपा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हेनरिक्स आणि मॅक्सवेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतके झळकावली. हे दोघे साडता बाकी सर्व फलंदाजांनी निराश केलं. प्रत्येकजण स्वस्तात माघारी परतले. विराटने डाव सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण 89 धावा काढून तो झेलबाद झाला. उपकर्णधार केएल राहुलनेही 76 धावा जमवत संघाला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, मोठ्या धावसंख्येसमोर भारताचा निभाव लागला नाही. या व्यतिरिक्त रविंद्र जडेजा (24) आणि हार्दिक पांड्या (28) सलग चेंडूवर परतले. तत्पूर्वी शिखर धवन (30), मयंक अग्रवाल (28) आणि श्रेयस अय्यर (38) यांना सुरुवातीला लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही.

Comments are closed.