Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली जगप्रसिद्ध ‘लोणार सरोवराची’ पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. ४ फेब्रुवारी :  लोणार सरोवर हा आमचा अमूल्य ठेवा आहे. या परिसराचा चांगला विकास झाल्यास हजारो नाही तर लाख्योच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक या सरोवराला पाहण्यासाठी येतील त्यामुळे येथील आर्थिक स्थिती सुधारेल लोणार सरोवराच्या विकासासाठी यशोचीत कार्य झाले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे आज ४ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जग प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराला भेट दिली या सरोवरा संदर्भाची माहिती जाणून घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून लोणार सरोवर ओळखल्या जाते. भूगर्भशास्त्रासह, खगोलिय अभ्यासासह जैविविधतेचा अभ्यास करण्यासाठी लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व सर्वश्रृत आहे. बेसॉट खड़ापासुन निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर जगविख्यात आहे जैविविधतेच्या दृष्टीनेही लोणार सरोवराचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणुनही त्याचा उल्लेख केल्या जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या लोणार संवाद सरोवराचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ वर्गवारीत महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम

टायर कंपन्यांकडून राज्यातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याने राज्य ग्राहक मंच यांनी स्वाधीकारे चौकशी करण्याची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना 

जिजाऊच्या जन्मस्थळाला वंदन करून धन्य झालो- राज्यपाल भगतसिंग कोशयारी

 

 

 

 

Comments are closed.