Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुरात ६६ व्या  धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य बाईक रॅली 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. १६ ऑक्टोंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात लाखो बौद्ध बांधवाना ऐतिहासिक दीक्षा दिल्यानंतर देशातील केवळ दुसरा व शेवटचा दीक्षा सोहळा चंद्रपुरात पार पडला. चंद्रपूरला आयोजित झालेल्या या घटनेचे स्मरण म्हणूनच दरवर्षी १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात  धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा केला जातो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूरात आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याच्या काना-कोप-यातून लाखो बौद्ध बांधव सहभागी होतात. यंदाचा हा  ६६ वा  सोहळा असून कोरोना काळानंतर कुठलाही प्रतिबंध नसताना आयोजित होणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्व आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वंदन करून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

सुमारे ३ किमी. मार्गक्रमण करत हि रॅली चंद्रपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मैदान अर्थात दीक्षाभूमीवर पोहचली. दीक्षाभूमीवर उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभावर पंचशील ध्वजारोहण प्रथेप्रमाणे पार पडले. तर चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून हा सोहळा प्रारंभ झाल्याचे सूचित केले गेले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याच परिसरातील भव्य स्तुपात अभय मुद्रेतील भगवान गौतम बुद्धाची उभी मूर्ती आहे. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा देखील आहे. सामूहिक बुद्धवंदना करून दीक्षाभूमीवरील कार्यक्रमांचा प्रारंभ करण्यात आला.

दि. १५ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक तथा प्रबोधनकार राहुल अनविकर यांचा बुद्ध धम्म गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच आज दि. १६ ऑक्टोंबर रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे व संच आणि वैशाली माडे व संच यांचा  बुद्ध धम्म गीतांचा (धम्म संध्या) कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी जिल्हा विदर्भ व राज्यातून लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित राहणार आहेत.

विस्तीर्ण दीक्षाभूमी परिसर हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीने फुलून गेला असून इथे पोहचलेल्या अनुयायांना शेकडो पुस्तक स्टॉलच्या माध्यमातून वैचारिक  पर्वणी मिळणार आहे. 

हे देखील वाचा : 

पालघरच्या रुद्राक्षने रचला। इतिहास

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करु! : नाना पटोले

 

 

Comments are closed.