Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आजादी का अमृत महोत्सव अंधारात कोरची तालुक्याची व्यथा कोण समजून घेणार ?

वीज मंडळाचा अनागोंदी कारभार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रवि मंडावार

कोरची, १७ ऑगस्ट :-  महाराष्ट्र राज्याच्या महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे. या भोंगळ कारभाराचा फटका स्वातंत्र्य दिनी कोरची तालुक्याला बसला.तसा तो नेहमीच बसत असतो. नेहमी भोंगळ कारभारासाठी चर्चेत राहणाऱ्या कोरची येथील विद्युत विभागाने तर स्वातंत्र्यदिनी कमालच केली. तब्बल ५० तास तालुक्यातील वीज गायब होती. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण देशाने आजादी का अमृत महोत्सव साजरा केला. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आदिवासीबहुल नक्षलग्रस्त असलेल्या कोरची तालुक्यातील विद्युत पुरवठा विभागाने काहीच प्रगती केलेली नाही. ७५ तासांपैकी ५० तास कोरची तालुका अंधारात होता. हे प्रशासनाचे अपयश म्हणावे का कोरचीचे दुर्दैव !
देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे कोरची तालुक्यातील बहुतेक विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु संपूर्ण देशात रोषणाई होत असताना कोरची तालुका मात्र अंधारात चाचपडत उत्सव साजरे करीत होता . विद्युत विभागाचा अनागोंदी कारभाराचा फटका कोरची तालुक्याला बसला. विद्युत् विभागाच्या सुधारणेसाठी कित्येक निवेदन, आंदोलन व उपोषण करण्यात आले परंतु परिस्थिती अजूनही जैसे थे च आहे.
आज तंत्रज्ञानाच्या युगात कुठल्याही समस्येचे हल त्वरित होते. परंतु कोरची तालुक्यात ही तत्परता दिसली नाही. त्यामुळे विद्युत विभागाचे काम शुन्यच असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना अवाच्या सव्वा बिल येते. सेवा मात्र कवडीमोलाची . यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत असून याचा भविष्यात उद्रेक होऊ शकतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात विषारी जीवजंतूचा संचार पाहायला मिळतो.आजपर्यंत तालुक्यात कित्येक लोकांचा जीव विषारी जीव जंतूमुळे नाहक गेला आहे. अंधारात या जीवजंतूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सतत होणाऱ्या वीज खंडितेमुळे शेतकऱ्यांना सुद्धा शेतीची कामे करण्यास अडचणीच निर्माण होत आहे. सध्याचे युग हे डिजिटल झाले आहे. विद्यार्थ्यांना व नागरिकांना बहुतेक कामे ही ऑनलाईन पद्धतीने करावी लागतात. मात्र कोरची तालुका डिजिटल युगापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून काही दिवसांपूर्वी MS-CIT चे विद्यार्थी हे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे परीक्षेपासून मुकले आहेत. त्यांनी कोरची येथील विद्युत कार्यालयावर मोर्चा सुद्धा नेला होता. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात उद्योग – व्यापार देशोधडीला लागले आहेत. त्यात या वीज खंडितेचा उद्योग- व्यापारावर देखील प्रतिकूल परिणाम झाला आहे.

मात्र विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी कोरची तालुक्यात विकासाची गंगा येईल का ? असा येथील नागरिकांचा शासनाला सवाल आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-  

ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

Comments are closed.