Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हयात आठवडी बाजारावर बंदी – जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आदेश

सार्वजनिक उत्सव तसेच इतर सन साधेपणाने साजरे करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १० मार्च: राज्यात सद्यास्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश याआगोदरच दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सामाजिक अंतर राखून केवळ दैनिक बाजार भरविण्यास परवानगी देणेत आली आहे. परंतू जिल्ह्यात कोणत्याही भागात आठवडी बाजार भरविण्यास आज दिलेल्या आदेशान्वये सक्त मनाई करण्यात आली आहे. सदरील आदेश शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने पुढील आदेशापर्यंत निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेश निर्गमित करीत असताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी येत्या काळातील सर्व सार्वजनिक उत्सव तसेच सन यामध्ये होळी, धुलिवंदन सर्वांनी साधेपनाने व घरीच साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली दीपक सिंगला यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि. 28 मार्च 2021 रोजी होळी व दि.29 मार्च 2021 रोजी धुलीवंदन उत्सव सन होत असून सदर उत्सव कार्यक्रमात नागरिक मोठया प्रमाणात एकत्रीत येऊन गर्दी होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच कोविड-19 संबंधात वेळोवेळी शासनाने करुन दिलेल्या एसओपीचे पालन गर्दी एकत्रित झाल्याने होणार नाही. त्याअनुषंगाने होळी, धुलीवंदन सण कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील दरवर्षी होणाऱ्या यात्रेला दररोज 1200 ते 1500 च्या संख्येत भाविक दर्शनाकरीता ये-जा करीत आहेत. दि. 11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री असल्याने दरवर्षी प्रमाणे हजारोंच्या संख्येने भाविकांची दर्शनाकरीता गर्दी होण्याची दाट शक्यता असून मोठया प्रमाणात गर्दी होऊन कोविड-19 प्रतिबंधात्क उपाययोजना व नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा कोविड-19 प्रतिबंधात्क उपाययोजना व साथरोग अधिनियम 1897 अन्वये चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव देवस्थान, दि.10 मार्च 2021 ते 17 मार्च 2021 पर्यंत मार्कंडेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.
सदरील आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.