Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोड़धंदा करून आपली आर्थिक उन्नती साधावी: पं.स.सभापती भास्कर तलांडे यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी, दि. २५ मार्च: अहेरी पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत राजाराम येते पशुसंवर्धन विभाग प.स.अहेरी यांचा वतीने तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम व संपर्क शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

              सदर शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांनी सांगितले की, अहेरी तालुक्यांत शेती भरपूर असुन या भागातील शेतकरी फ़क्त चार महिने शेतीचे व्यवसाय करत असतात मात्र त्यानंतर मोलमजुरी करत दैनंदिन कामे करत असतात. शेतकऱ्यांनी शेती सोबतच जोड़धंदा म्हणून शेळी पालन,कुक्कुटपालन,भाजीपाला,लागवड आदि व्यवसाय करावे.आज शेळीपालन व्यवसायाला विशेष महत्व असुन शेळीपालनातून आर्थिक नफा जास्त असल्याने शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून शेळीपालन करावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून बचत गट व वैयक्तिक लाभ म्हणून दहा शेळी व एक बोकड दिला जातो. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेवुन आपली आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन सभापती भास्कर तलांडे यांनी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

      यावेळी  अहेरीचे पशुधन गट विकास अधिकारी डॉ.पावडे मार्गदर्शन करतांना म्हणाले, मान्सूनपूर्व लसीकरण व फायदे, विविध रोग,प्रादुर्भाव नियंत्रण व साथरोग नियंत्रण व पशुसंवर्धन विभागातील योजनेची माहिती,लसीकरणाचे महत्व,जनावरांचे बिल्ले,आधार कार्ड, जर्शी गाय पासून मिळणारे उत्पन्न यांवर मार्गदर्शन केले.

      प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सदस्य नारायण कम्बगौनिवार,ग्राम पंचायत सदस्या सपना मारकवार,पेसा अध्यक्ष सत्यवान आलाम,तंटामुक्ती समितीचे सदस्य राकेश सड़मेक, जयराम दुर्गे,संजय घंटावार आदिची  मंचावर उपस्थिती होती.

         कार्यक्रमाचे संचालन भैसारे तर आभार प्रदर्शन ग्रामसेविका गावंडे यांनी केले. यावेळी शेतकरी बांधव व बचत गटाच्या महिलांची उपस्थित होती.

Comments are closed.